Sharad Mohol Murder : शरद मोहोळ खून प्रकरणातील सर्व आरोपींना हाय सेक्युरिटी येरवडा जेलमध्ये हलवले-mohol murder case six accused sent to magistrate custody ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Mohol Murder : शरद मोहोळ खून प्रकरणातील सर्व आरोपींना हाय सेक्युरिटी येरवडा जेलमध्ये हलवले

Sharad Mohol Murder : शरद मोहोळ खून प्रकरणातील सर्व आरोपींना हाय सेक्युरिटी येरवडा जेलमध्ये हलवले

Jan 20, 2024 03:19 PM IST

Sharad Mohol Murder : गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणातील तीन हल्लेखोरांसह एकूण सहा आरोपींना शुक्रवारी कडेकोट बंदोबस्तात सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग एसी बिराजदार यांनी न्यायालयीन कोठडी मंजूर केली.

gangster sharad mohol murderer arrested
gangster sharad mohol murderer arrested

Sharad Mohol Murder : गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणातील प्रमुख आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. आता पर्यंत १५ पेक्षा अधिक जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. या पैकी प्रमुख तीन हल्लेखोरांसह ६ आरोपींना कडेकोट बंदोबस्तात सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग एसी बिराजदार यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी देत त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली.

manoj jarange patil : आता गोळ्या घातल्या तरी माघार नाही; मराठा आरक्षणाबाबत जरांगे-पाटील भावुक, आंदोलक मुंबईला रवाना

गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणातील तीन हल्लेखोरांसह एकूण सहा आरोपींना शुक्रवारी कडेकोट बंदोबस्तात सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीनंतर न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग एसी बिराजदार यांनी न्यायालयीन कोठडी मंजूर केली.

१४ दिवसांच्या कोठडीत चौकशी पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता सर्व आरोपींना येरवडा मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले आहे.

साहिल पोळेकर, नामदेव कानगुडे, विठ्ठल गंडाळे, अमित कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर यांना पुणे पोलिसांनी ५ जानेवारी रोजी गुंड शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी अटक केली होती. पोलिसांच्या चौकशीनुसार, त्यांनी पूर्ववैमनस्य आणि शेतीच्या वादातून शरद मोहोळचा खून करण्याचा कट आखला होता. ५ जानेवारी रोजी आरोपी पोळेकर व त्याच्या साथीदारांनी मोहोळ येथे त्याच्या राहत्या घराजवळ गोळीबार केला होता. तर त्याच दिवशी रात्री उशिरा पुणे-सातारा रोडवरील शिरवळजवळील किकवी येथून दोन प्रॅक्टिस करणाऱ्या वकिलांसह आठ जणांना पोलिसांनी अटक करून दोन गाड्या जप्त केल्या, तीन पिस्तुले, तीन मॅगझिन आणि पाच राऊंड जप्त केले होते.

आरोंपींनी शरद मोहोळ याला ठार मारण्यासाठी मावळ येथे सराव देखील केला होता. दरम्यान, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने नवी मुंबई येथे पनवेल परिसरात धाड टाकून या प्रकरणाचा म्होरक्याला अटक केली. या आरोपींना पुणे न्यायालयात दाखल केले असता, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी देत त्यांची रवानगी ही येरवडा जेलमध्ये केली आहे.

विभाग