'मालवणमध्ये जे झालं ते अतिशय वेदनादायी होते. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. मालवण येथील शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणात नतमस्तक होऊन माफी मागतो. या घटनेमुळे शिवभक्तांच्या मनाला ठेस पोहचली आहे. त्यांचीही मी माफी मागतो, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. पालघर येथील सिडको मैदानात वाढवण बंदराच्या पायाभरणी समारंभात भूमिपूजन कार्यक्रमात मोदी बोलत होते. मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवातच शिवभक्तांच्या भाषणाने केली.
मोदी म्हणाले,'जे झालं ते अतिशय वेदनादायी होतं. मी शिवाजी महाराजांच्या चरणात नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो. असं मोदी म्हणाले.
पंतप्रधा नरेंद्र मोदी भाषणात म्हणाले की पश्चताप न होणाऱ्यांपैकी आम्ही नाहीत. काही जण वीर सावरकरांना नाव ठेवतात. परंतु त्यांनी कधी सावरकरांची माफी मागितली का? या प्रसंगी शिवाजी महाराज ज्यांचे आराध्य दैवत आहेत त्या असंख्य लोकांना वेदना झाल्या असतील. त्यांचीही माफी मागतो.
२०१३ साली भाजपने जेव्हा मला पंतप्रधानपदाचे उमेदवार निश्चित केले तेव्हा मी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर जाऊन बसलो होतो. तेथून मी माझ्या नव्या प्रवासाला सुरुवात केला होता, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
'माझ्यासाठी आणि सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे नाव नाही आणि ते आमच्यासाठी दैवत आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
नरेंद्र मोदी यांनी यावेळी वाढवण बंदराचे वैशिष्ट विषद करत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली. २०१९ नंतर राज्यात आलेल्या सरकारने वाढवण बंदर उभारणीच्या कामात खोडा घातला होता, असा आरोप मोदींनी केला.
मोदी आपल्या भाषणात म्हणाले, 'एक काळ होता जेव्हा भारत देश हा संपूर्ण जगात सर्वात शक्तिशाली मानला जात असे. सागरावर आमचं वर्चस्व होतं. सागरी महामार्गावरून होणाऱ्या व्यापाराला छत्रपती शिवाजी महाराजांनी नव्या उंचीवर नेऊन ठेवलं होतं. ॲडमिरल कान्होजी आंग्रे यांनी ईस्ट इंडिया कंपनीविरोधात लढाई केली होती. परंतु स्वातंत्र्यानंतर या वारशांवर फारसं लक्ष दिलं गेलं नाही, असं मोदी म्हणाले. पंतप्रधान म्हणून महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण कोणकोणती पावलं उचलली हे मोदींनी यावेळी भाषणात नमूद केलं.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, महिलांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विकासाचे विविध मानदंड प्रस्थापित करत आहे. यावेळी त्यांनी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, राज्याच्या मुख्य वन संरक्षक शोमिता बिस्वास, कायदा आणि न्याय विभागाच्या प्रमुख सुवर्णा केवले, सीमाशुल्क विभागाच्या प्रमुख प्राची स्वरूप, मुंबई मेट्रो कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, राज्याच्या प्रधान महालेखाकार जया भगत तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर यांनी नावे आपल्या भाषणात घेतली.