मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Yavatmal News: किशोरवयीन मुलांना मोबाइल बंदी; यवतमाळमधील बान्सी ग्रामसभेचा ठराव
 बान्सी येथे सुरू असलेली ग्रामसभा
बान्सी येथे सुरू असलेली ग्रामसभा

Yavatmal News: किशोरवयीन मुलांना मोबाइल बंदी; यवतमाळमधील बान्सी ग्रामसभेचा ठराव

16 November 2022, 10:28 ISTNinad Vijayrao Deshmukh

Yavatmal News : मोबाइल पासून होणारे हे धोके पाहता यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बान्सी गावाने एक महत्वपूर्ण ठराव केला आहे. गावातील १८ वर्षांखालील मुलांना गावात मोबाइल बंदी करण्याच्या ठराव ग्रामसभेत घेण्यात आला आहे.

यवतमाळ : आजची तरुण पिढी ही मोबाईलच्या आहारी गेलेली दिसत आहे. चार चौघांत बसले असतांना मोबाइलमध्ये डोके असल्याने पूर्वी सहज होणारा संवाद देखील हरवत चालला आहे. त्यात सातत्याने मोबाइल पहिल्याने मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होत आहे. मोबाइल पासून होणारे हे धोके पाहता यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील बान्सी गावाने एक महत्वपूर्ण ठराव केला आहे. गावातील १८ वर्षांखालील मुलांना गावात मोबाइल बंदी करण्याच्या ठराव ग्रामसभेत घेण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मोबाइल आज ही गरजेची वस्तु झाली आहे. जसे त्याचे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. आजची तरुण पिढी तर मोबाइलच्या आहारी गेली आहे. मोबईल वर रिल्स आणि व्हिडिओ बघण्यात तासंतास वेळ वाया घालवला जात आहे. कोरोना काळात तर शिक्षणासाठी लहान मुलांच्या हातापर्यन्त मोबाइल गेल्याने ते देखील मोबाइल च्या आहारी गेले आहेत. तसेच काही पालक मुलांना शांत करण्यासाठी अगदी बाल्यावस्थेत त्यांच्या हाती मोबाइल देत आहे. यामुळे त्यांना याचा फायदा होण्याएवजी मुलामध्ये मोबाइलचे व्यसन जडत आहे.

मोबाइलचे सर्व दुष्परिणाम बान्सी ग्रामस्थाना देखील अनुभवायला आले. त्यामुळे मुलांना मोबाइल पासून परावृत करण्यासाठी बान्सी ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. या ग्रामसभेत मुलांना मोबाइलमुळे लागणाऱ्या वाईट सवई पाहता १८ वर्षांखालील मुलांना मोबाइल बंदी करण्याचा ठराव ग्रामस्थांनी पारित केला. पुसद तालुक्यातील साग जंगलाला लागून असलेल्या या गावात ११ नोव्हेंबर रोजी ही ग्रामसभा पार पडली. यात हा महत्वपूर्ण निर्णय ग्रामस्थांनी घेतला. या सोबतच जे नागरिक १०० टक्के कर भरतील त्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना लागू करणे तसेच निराधार लोकांसाठी वृद्धाश्रम बांधण्याचा महत्वपूर्ण निर्णय देखील ग्रामसभेत घेण्यात आला. गावाने केलेल्या या निर्णयाचे आजूच्या गावांनी स्वागत केले आहे. गाव मुलांच्या आरोग्याच्या बाबतीत सतर्क असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. हा आगळावेगळा निर्णय घेऊन तरुणाईला चांगले वळण लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे सर्वत्र कौतुक आहे.

 

विभाग