धक्कादायक! मुलींच्या शाळेतील प्रसाधनगृहात मोबाइल ठेवून केले व्हिडिओ शूटिंग! शाळेच्या शिपायाविरुद्ध गुन्हा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धक्कादायक! मुलींच्या शाळेतील प्रसाधनगृहात मोबाइल ठेवून केले व्हिडिओ शूटिंग! शाळेच्या शिपायाविरुद्ध गुन्हा

धक्कादायक! मुलींच्या शाळेतील प्रसाधनगृहात मोबाइल ठेवून केले व्हिडिओ शूटिंग! शाळेच्या शिपायाविरुद्ध गुन्हा

Jan 09, 2025 10:02 AM IST

Pune Crime : पुण्यात पाषाण येथील मुलींच्या शाळेत शाळेतील प्रसाधनगृहात मोबाइल ठेवून शूटिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! मुलींच्या शाळेतील प्रसाधनगृहात मोबाइल ठेवून केले व्हिडिओ शूटिंग! शाळेच्या शिपायाविरुद्ध गुन्हा
धक्कादायक! मुलींच्या शाळेतील प्रसाधनगृहात मोबाइल ठेवून केले व्हिडिओ शूटिंग! शाळेच्या शिपायाविरुद्ध गुन्हा

Pune Pashan Crime पुण्यात पाषाण परिसरातील एका मुलींच्या शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या शाळेतील स्वच्छतागृहात चोरून मोबाइल ठेऊन मुलींचे व्हिडीओ शूटिंग केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी शाळेतील शिपायाला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकार ?

पुण्यात पाषाण भागात एक मुलींची शाळा आहे. या शाळेत मंगळवारी शारिरिक शिक्षणाचा तास होता. यावेळी मैदानावर सर्व प्रशिक्षण पार पडल्यानंतर विद्यार्थिनी या शाळेतील प्रसाधनगृहात गेल्या. यावेळी आरोपी शिपाई हा मुलींच्या कपडे बदलण्याच्या खोलीजवळ थांबला होता. यावेळी काही विद्यार्थिनींनी त्याला पाहिले. व त्यांना हटकून बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, या शिपायाने त्याचा मोबाइल तेथेच ठेऊन कॅमेरा सुरू ठेऊन निघून गेला होता. हा प्रकार प्रसाधनगृहाजवळ थांबलेल्या एका मुलीच्या लक्षात आला. तिने मोबाइल पाहिला तेव्हा व्हिडिओ शूटिंग सुरू होते. या बाबतची माहिती मुलीने शाळेतील शिक्षकांना दिली. याची गंभीर दखल घेत शाळेच्या प्रशासनाने याची माहिती चतु:शृंगी पोलिसांना दिली. यावेळी तातडीने पोलिस शाळेत दाखल झाले. त्यांनी शिपायाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोबाइल जप्त करण्यात आला आहे. तसेच मोबाइलचे तांत्रिक विश्लेषण केले जाणार आहे. आरोपीवर बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात नृत्यशिक्षकाने मुलावर केला होता अत्याचार

पुण्यात कर्वेनगर येथील शाळेत नृत्य शिक्षकाने शाळेतील ११ वर्षांच्या मुलावर अत्याचार केले होते. या घटनेने खळबळ उडाली होती. मुलाने समुपदेशन करताना हा प्रकार सांगितला. याप्रकरणी नृत्य शिक्षकाला वारजे पोलिसांनी अटक केली होती. या घटनेमुळे शाळेतील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर