Amravati News : गाझियाबाद यथे महंत यति नरसिंहानंद यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात उमटले आहेत. अमरावतीत संतप्त जमावाने एका पोलीस ठाण्यावर तूफान दगड फेक केली. या दगडफेकीत २९ पोलिस जखमी झाले असून शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करून जमवावर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी शहरात जमाव बंदी लागू केली आहे.
या घटनेचा व्हिडिओ पीटीआयने प्रसिद्ध केला आहे. या व्हिडिओमध्ये नागपूर गेट पोलिस ठाण्याच्या आवारात मोठ्या प्रमाणात हिंसक जमाव दगडफेक करताना दिसत आहे. मोठा जमाव पोलिस ठण्यासमोर येत त्यांनी घोषणाबाजी करत यति नरसिंहानंद यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी जमाव अचानक संतप्त झाला आणि त्यांनी पोलिस ठाण्यावर दगडफेक सुरू केली. हल्लेखोर पूर्ण तयारीने आल्याचे समजते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
गाझियाबाद येथे स्वामी यती नरसिंहानंद यांनी वादग्रस्त विधान केले होते. यामुळे वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या स्वामी यती नरसिंहानंद त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी शुक्रवारी रात्री अमरावतीच्या नागपूरी गेट पोलीस स्टेशनवर मोठ्या संख्येने जमाव जमला. यावेळी मोठी घोषणाबाजी जमावकडून सुरू होती. दरम्यान, काही वेळातच या जमावाने नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर मोठी दगड फेक केली. या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनाचे व पोलीस स्टेशनचे देखील नुकसान झाले. तसेच २९ पोलिस देखील जखमी झाले.
तब्बल दोन ते अडीच हजार लोक पोलिस ठाण्यासमोर जमली होती. हा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी रात्री हवेत गोळीबार करत अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडून लाठीचार्ज केला. रात्री १ नंतर परिस्थिती नियंत्रणात आली. जमावाकडून करण्यात आलेला दगडफेकीमध्ये काही पोलिस अधिकारी जखमी झाले. पोलिसांनी जमावमाबंदीचे आदेश दिले आहेत.
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील डासना येथील देवी मंदिराचे महंत यति नरसिंहानंद यांनी २९ सप्टेंबर रोजी पैगंबर मोहम्मद साहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. गुरुवारी रात्री त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. गाझियाबाद पोलिसांनी येतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, केवळ एफआयआर पुरेसा नाही, येतीला तात्काळ अटक करण्यात यावी, असे मुस्लिम समाजातील लोकांचे म्हणणे आहे.
सोशल मीडियावर येतीवरील कारवाईसाठी लोकांनी आवाज उठवला असतानाच लोकांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजीही केली. गाझियाबादमध्येही शुक्रवारी रात्री अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. त्याचवेळी महाराष्ट्रातील अमरावतीयेथे जमावाला हिंसक वळण लागले. शेकडोच्या संख्येने आलेल्या लोकांनी आधी घोषणाबाजी केली आणि नंतर अचानक दगडफेक सुरू केली. पोलिसांनी मोठ्या कष्टाने परिस्थिती नियंत्रणात आणली. शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. नागपुरी पोलिस ठाण्याभोवती मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात आहे. आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या