मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Solapur Crime News : लव्ह जिहादच्या संशयावरून जमावाचा तरुणावर हल्ला; सोलापुरातील धक्कादायक प्रकार

Solapur Crime News : लव्ह जिहादच्या संशयावरून जमावाचा तरुणावर हल्ला; सोलापुरातील धक्कादायक प्रकार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 07, 2023 07:40 PM IST

Solapur Crime News : जय श्रीरामच्या घोषणा देत सोलापुरात एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Solapur Crime News Marathi
Solapur Crime News Marathi (HT_PRINT)

Solapur Crime News Marathi : लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून देशभरात राजकीय वादंग पेटलेलं असतानाच आता त्याचे लोण महाराष्ट्रातही पसरत आहे. कारण दुसऱ्या धर्मातील तरुणीची भेट घेतली म्हणून एका तरुणाला जमावानं मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सुदैवानं झुंडीच्या मारहाणीत तरुणाचा थोडक्यात बचावला असून त्याच्या बरगड्यांमध्ये गंभीर मार लागला आहे. त्यानंतर आता या प्रकरणात सोलापुरातील सदर बझार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यामुळं आता या धक्कादायक घटनेमुळं राज्यात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरात एका तरुण दुसऱ्या धर्मातील तरुणीला कामानिमित्त भेटण्यासाठी शहरातील एम्लॉयमेंट चौकात आला होता. कामासंबंधीत चर्चा झाल्यानंतर दोघे एका दुकानात आइस्क्रिम खाण्यासाठी गेले. पीडित तरुण विवाहित असून तरुणी अविवाहित आहे. त्यानंतर असंख्य तरुणांचा जमाव जय श्रीरामच्या घोषणा देत आइस्क्रिम पार्लरमध्ये आला आणि तरुणाला जाब विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमावानं पीडित तरुणाला दुसऱ्या धर्मातील मुलीला तू कसा काय भेटू शकतो?, असा सवाल केला. त्यानंतर दुसऱ्या धर्मातील तरुणाशी कशासाठी संबंध ठेवतेस?, असा सवाल तरुणीला केला. त्यानंतर दोघांनी आमच्यात बहिण-भावासारखं नातं असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु जमावानं त्यांचं काहीही न ऐकता तरुणाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

तरुणाला बेदम मारहाण केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर पीडित तरुणानं तरुणीसह पोलीस ठाण्यात दाखल आरोपींविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर यांनी तक्रार अर्ज स्वीकारत प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. कायदा हातात घेऊन विनाकारण कुणालाही मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

IPL_Entry_Point