Raj Thackeray: राज ठाकरेंना कोर्टाचा मोठा दिलासा; १६ वर्षांपुर्वीच्या 'त्या' खटल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray: राज ठाकरेंना कोर्टाचा मोठा दिलासा; १६ वर्षांपुर्वीच्या 'त्या' खटल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता!

Raj Thackeray: राज ठाकरेंना कोर्टाचा मोठा दिलासा; १६ वर्षांपुर्वीच्या 'त्या' खटल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता!

Jul 07, 2024 04:01 PM IST

MNS: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १६ वर्षांच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मोठा दिलासा
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मोठा दिलासा (Hindustan Times)

Maharashtra Navnirman Sena: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली. मनसेनं सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे २००८ साली केलेल्या आंदोलनाप्रकरणी दाखल गुन्ह्यातून राज ठाकरे यांची इस्लामपूर न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. तब्बल, १६ वर्षानंतर राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मनसेच्या या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी २००७ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळातच राज यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन रान पेटवले. दरम्यान, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे यांनी २००८ मध्ये रेल्वे भरतीमध्ये मराठी मुलांना प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावरुन आंदोनल उभारले. त्यावेळी सांगलीतील शिराळा येथे मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. परंतु, या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यानंतर राज ठाकरे यांच्याविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला. तब्बल १६ वर्षांपासून राज ठाकरे यांच्याविरोधात इस्लामपूर न्यायलयात खटला सुरू होता. याप्रकरणी इस्लामपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता केली. मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी याबाबत माहिती दिली.

नेमकं प्रकरण काय?

मनसेने २००८ मध्ये मराठीचा मुद्दा उपस्थित करून रेल्वे भरतीमध्ये मराठी मुलांना प्राधन्य देण्याची मागणी केली. याासाठी त्यांनी महाराष्ट्रभर आंदोनल सुरू केले. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी सांगली जिल्ह्यातील शिराळा येथेही आंदोलन सुरू केले. मात्र, या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यामुळे राज ठाकरे यांच्यासह मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी निकाल देत इस्लामपूर न्यायालयाने राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता केली.

वरळी हिट अँड रनप्रकरणी मनसे आक्रमक

पुण्यातील कल्याणीनगरमधील हिट अँड रन अपघाताचे प्रकरण ताजे असतानाच आत वरळीतील ॲट्रिया मॉलजवळ रविवारी पहाटे भीषण अपघात घडला. एका BMW वाहनानं दुचाकीवर मासळी घेऊन चालेल्या नाखवा दाम्पत्याला मागून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पती बाजूला फेकला गेला आणि वाहनाने महिलेला १०० मीटरपर्यंत फरफटत नेलं. या दुर्दैवी अपघातात महिलेचा मृत्यू झाला.

संदीप देशपांडे काय म्हणाले?

याप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “अत्यंत घृणास्पद असा हा गुन्हा आहे. वाहन चालकाने जर वेळीच ब्रेक मारला होता आणि तो तिथेच थांबला असता तर संबंधित महिला आज जिवंत असत्या. बीएमडब्लू वाहन चालकाने जर ब्रेक मारल्यानंतर गाडी चालू केली नसती तर या महिलेचा मृत्यू झाला. वाहन चालकाने पळून जाण्याच्या नादात त्यांना १०० मीटरपर्यंत फरफटत नेले. त्यामुळे वाहन चालकावर कलम ३०२ चा गुन्हा दाखल झाला पाहीजे. जो कुणी आरोपी असेल त्यावर कडक कारवाई करावी. आरोपीचे कुठलेही राजकीय संबंध असले तरी त्यांना सोडता कामा नये. अशा गुन्हेगारांचे राजकीय संबंध असले तरी आम्ही त्यांना सोडू देणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई होण्यासाठी पाठपुरावा करत राहू", अशा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर