मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray In Nagpur : राज ठाकरेंच्या मिशन विदर्भाला सुरुवात; पक्षवाढीसाठी असा आहे प्लॅन

Raj Thackeray In Nagpur : राज ठाकरेंच्या मिशन विदर्भाला सुरुवात; पक्षवाढीसाठी असा आहे प्लॅन

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 18, 2022 10:09 AM IST

Raj Thackeray Vidarbha Visit : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पाच दिवस दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.

Raj Thackeray MNS Vidarbha Visit
Raj Thackeray MNS Vidarbha Visit (HT PHOTO)

Raj Thackeray MNS Vidarbha Visit : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. पाच दिवसांच्या या दौऱ्यात ते नागपूर, अमरावती आणि चंद्रपूरमध्ये मनसैनिकांच्या बैठका घेणार आहेत. त्यामुळं आता महापालिकांच्या निवडणुकीआधी विदर्भात पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत असल्याचं बोललं जात आहे.

मुंबईतून विदर्भ एक्स्प्रेसनं राज ठाकरे आज सकाळी नागपूरात पोहचले आहेत. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं रेल्वे स्टेशनवर जंगी स्वागत केलं असून त्यांना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज ठाकरेंच्या या विदर्भ दौऱ्यात मनसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा अर्थ काय?

विदर्भात येत्या काही महिन्यांत किमान सात ते आठ महापालिकांच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळं मनसेच्या पक्ष संघटनेला बळ देण्यासाठी आणि नवीन लोक पक्षासोबत जोडण्यासाठी राज ठाकरे या दौऱ्यात प्रयत्न करणार असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय ते नागपूर, अमरावती आणि चंद्रपूरात पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊ निवडणुकपूर्व स्थितीचा आढावा घेणार आहेत. याशिवाय पक्ष संघटनेत बदल करून तरुण कार्यकर्त्यांना पक्षात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भातील काही मान्यवरांच्या भेटीही राज ठाकरे घेणार आहेत. त्यांचं मार्गदर्शन घेऊन ते मनसेची संघटनात्मक बांधणी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं बोललं जात आहे.

कसा आहे राज ठाकरेंचा विदर्भ दौरा?

-आज सकाळी ११ वाजता नागपूरात मनसैनिकांसोबत बैठक

-गाठीभेटी आणि त्यानंतर पत्रकार परिषद

-दुपारी दोन वाजता चंद्रपूरला जाणार

-चंद्रपूरात मनसेच्या विभागवार बैठका घेणार

-२० आणि २१ सप्टेंबरला अमरावतीत पक्षाच्या नेत्यांच्या बैठका घेणार

- २२ सप्टेंबरला मुंबईत परत येतील.

IPL_Entry_Point

विभाग