Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर जारी
Raj Thackrey gudipadwa Teaser: गुढीपाडवा निमित्त मनसेकडून नवा टीझर जारी करण्यात आला आहे.
MNS New Teaser Released: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा २२ मार्चला शिवाजी पार्क येथे होणार आहे. मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरेलयांनी पाडवा मेळाव्यात सगळ बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला होता. यामुळे पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेकडून नवा टीझर जारी करण्यात आला आहे. मनसेच्या या टीझरमध्ये हिंदुत्व, मराठी भाषा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबद्दल बोलण्यात आले आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
या व्हिडिओच्या सुरूवातीलाच हिंदू ही दोन अक्षरं जगा, मराठी या तीन अक्षरांवर प्रेम करा, महाराष्ट्र या चार अक्षरांसाठी काम करा. राज ठाकरे ही पाच अक्षर नेहमीच पाठीशी असतील, असं लिहिण्यात आलं आहे. यानंतर राज ठाकरेंचं भाषण ऐकू येते. "माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मी मराठी म्हणून अंगावर जाईन, माझ्या धर्माला कुणी नख लावायचा प्रयत्न केला, तर मी हिंदू म्हणून अंगावर जाईन", असं राज ठाकरे म्हणत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये 'ठाकरी तत्त्व, मराठी सत्त्व आणि धर्माभिमानी हिंदुत्व' असं लिहिण्यात आलं आहे.
राज ठाकरे यांची २२ मार्चला संध्याकाळी ६ वाजता शिवाजी पार्कवर गुढी पाडवा मेळाव्यानिमित्त जाहीर सभा होणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून मोठे उलेटफेर पाहायला मिळाले आहेत. मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरेलयांनी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी अनेक महत्त्वाच्या विषयावर बोलणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे राज ठाकरे या संपूर्ण राजकारणाबाबत कोणती भूमिका घेणार आणि खास त्यांच्या शैलीत कोणावर घणाघात करणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
विभाग