Raj Thackeray: वाहतूक कोंडी पाहून राज ठाकरे संतापले; यावेळी ठाणे- मुलुंड टेालनाक्यावर...-mns president president raj thackeray angry over thane mulund toll plaza over traffic video goes viral ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray: वाहतूक कोंडी पाहून राज ठाकरे संतापले; यावेळी ठाणे- मुलुंड टेालनाक्यावर...

Raj Thackeray: वाहतूक कोंडी पाहून राज ठाकरे संतापले; यावेळी ठाणे- मुलुंड टेालनाक्यावर...

Feb 03, 2024 12:03 AM IST

Raj Thackeray thane mulund toll plaza Video: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ठाणे मुलंड टोलनाक्यावरील व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray

Raj Thackeray Viral Video: मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे आज नाशिक दौऱ्यावर होते. हा दौरा पू्र्ण करून मुंबईकडे जात असताना राज ठाकरे यांनी आज ठाणे- मुलुंड टोलनाक्यावर वाहतूक कोंडीत अडकलेली वाहने सोडविली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राज ठाकरे आपल्या गाडीतून खाली उतरून टोल कर्मचाऱ्यांचा समाचार घेताना दिसत आहेत. त्याचबरोबर टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडी सोडवण्याच्या सूचनाही देत आहेत.

नाशिकहून मुंबईला परतत असताना ठाणे-मुलुंड टोलनाक्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, मनसे नेते राज ठाकरेही तेथून जात होते. वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहून राज ठाकरे संतापले. त्यांनी स्वत: गाडीतून खाली उतरत टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना सुनावले. हा संपूर्ण प्रकार शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते.

व्हायरल व्हिडिओमध्ये राज ठाकरे यांनी वाहतूक कोंडी हटवण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांना टोल न घेताच वाहनांना पुढे जाण्यास सांगितले. यावेळी राज ठाकरेंच्या ताफ्यात शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता.या घटनेदरम्यान टोलनाक्याजवळील रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

यापूर्वी ७ जानेवारी २०२३ रोजी राज ठाकरे यांनी स्वतः कोल्हापूर टोल नाक्यावर उभे राहून टोलनाक्यावरील वाहतूक कोंडी सोडवली होती. यासोबतच त्यांनी टोलचालकाला मनसे स्टाईलमध्ये समजावून सांगण्याचा इशाराही दिला होता.

Whats_app_banner
विभाग