मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MNS News : अमित ठाकरेंनी माथाडी नेत्याला मारहाण केल्याचा आरोप; खारघरमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आपसात मोठा राडा

MNS News : अमित ठाकरेंनी माथाडी नेत्याला मारहाण केल्याचा आरोप; खारघरमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आपसात मोठा राडा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jan 09, 2024 07:22 PM IST

Mns Big Clash in Navi Mumbai : माथाडी कामगार नेते महेश जाधव यांनी मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

clash between mathadi workers and mns party worker
clash between mathadi workers and mns party worker

मनसेमध्ये पहिल्यांदाच अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर संघर्ष उफाळला आहे. मनसे कार्यकर्ते आणि माथाडी कामगार यांच्यात आज खारघरमधील मेडिकव्हर रुग्णालयाबाहेर मोठा राडा झाला. नवी मुंबईत कामगार नेते महेश जाधव यांच्या समर्थक माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. रुग्णालयाच्या परिसरातच माथाडी कामगारांनी मनसे कार्यर्त्यांना ही मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. मोठ्या संख्येने असलेल्या माथाडी कामगारांच्या मारहाणीनंतर मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

दुसरीकडे माथाडी कामगार नेते महेश जाधव यांनी मनसेचे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला. त्यावर आता मनसेकडून प्रतिक्रिया आली. महेश जाधव यांनी अमित ठाकरेंचा अपमान केल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी संदीप देशपांडे यांना मारहाण केल्याचं सांगितलं.

मनसेच्या पदाधिकाऱ्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पक्षावर गंभीर आरोप केला. राज ठाकरेंचा पक्ष खंडणीखोर आहे, असा गंभीर आरोप महेश जाधव यांनी केला आहे. कामगारांची बाजू सोडत नाही म्हणून मनसे नेते अमित ठाकरे यांनीच आपल्याला राजगड येथे बोलवून बेदम मारहाण केल्याचा दावा त्यांनी केला आहे. महेश जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अमित ठाकरे यांच्यावर मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

खारघरमधील मेडिकव्हर रुग्णालयाबाहेर मनसैनिकांना मारहाण केली. त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी कामोठे येथील महेश जाधवांचं कार्यालय फोडलं आहे.

'राज ठाकरेंच्या आदेशनुसार, 'मराठी कामगार सेना'या संघटनेची आणि त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे.'मराठी कामगार सेना'या संघटनेचा,त्या संघटनेच्या  पदाधिकाऱ्यांचा आजपासून'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'शी संबंध नसेल.' मराठी कामगार सेने'च्या पदाधिकारी सदस्यांशी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संबंध नसेल, असंही मनसेने स्पष्ट केलं आहे.

WhatsApp channel