मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MNS on Sharad Pawar : 'आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा...', मनसेचा शरद पवारांवर पलटवार

MNS on Sharad Pawar : 'आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा...', मनसेचा शरद पवारांवर पलटवार

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 22, 2022 06:40 PM IST

हाताच्या बोटावर मोजण्याइतपतही ज्यांना आपले आमदार विधीमंडळात आणता येत नाहीत त्यांच्याबद्दल काय भाष्य करायचं?", शरद पवारांच्या या टीकेला आता मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

मनसेचा शरद पवारांवर पलटवार
मनसेचा शरद पवारांवर पलटवार

मुंबई - शिवसेना ही शरद पवारांच्या (Sharad Pawar) प्राणी संग्रहालयातील मांजर बनली आहे. दसरा मेळाव्यातही शरद पवारांचेच विचार मांडले जातील, अशी खोचक टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली होती. याबाबत विचारले असता शरद पवार यांनी थेट राज ठाकरेंवर हल्लाबोल केला. “प्राणी वगैरे संदर्भातील उल्लेख मी काही करणार नाही. हाताच्या बोटावर मोजण्या इतपतही ज्यांना आपले आमदार विधीमंडळात आणता येत नाहीत त्यांच्याबद्दल काय भाष्य करायचं?", अशा शब्दात शरद पवार यांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) सणसणीत टोला लगावला होता. शरद पवारांच्या या टीकेला आता मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्विटरवरून शरद पवार यांच्या या टीकेवर पलटवार केला आहे.

'आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल आणि परवा.... बोटं तोंडात घालाल. आम्ही'धन'से कमी आहोत, पण'मनसे'लई आहोत. #मौका_सभी_को_मिलता_है आदर देतोय,आदर घ्या.' असं ट्वीट राजू पाटील यांनी केलं आहे.

<p>मनसे आमदाराचे ट्विट</p>
मनसे आमदाराचे ट्विट

शिवसेनेवर टीका करत असताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला होता. शिवसेना शरद पवारांच्या प्राणीसंग्रहालयातली मांजर झाली आहे. राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत आहे. शिवसेनेने राज ठाकरेंचा धसका घेतला आहे. कितीही म्याव म्याव केलं तरी पिंजऱ्यातल्या मांजराला डरकाळी फोडता येत नाही. बाळासाहेबांचे विचारच नाही तर दसरा मेळावा घेऊन काय फायदा? तुम्ही शरद पवारांचेच विचार देणार आहात, ते कधीही देता येतात, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली होती.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या