मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vasant More: मनसेच्या वसंत मोरे यांचं शिंदे-फडणवीसांना आव्हान, म्हणाले…

Vasant More: मनसेच्या वसंत मोरे यांचं शिंदे-फडणवीसांना आव्हान, म्हणाले…

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 05, 2022 03:34 PM IST

Vasant More challenge to Eknath Shinde: सोयीनुसार प्रभाग रचना बदलली जात आहे. तुम्ही केतीही तोडा आणि फोडा आम्ही लढायला तयार आहोत. हिंमत असेल तर निवडणुकांना सामोरे जा. महापौरांची निवडही जनतेतून करा, पुढचा महापौर हा मनसेचाच असेल, असे वसंत मोर म्हणाले.

वसंत मोरे
वसंत मोरे

पुणे : एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून महाविकास आघाडी सरकारचे अनेक निर्णय त्यांनी बदलले आहे. महानगर पालिकेच्या प्रभाग रचनाही त्यांनी पूर्वी प्रमाणे केली आहे. तसेच जनतेतून आता महापौर निवडला जाणार आहे. यामुळे पुण्यात अनेक जन नाराज आहेत. यातूनच मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे. जनतेतून महापौर निवडल्यास मनसेचाच विजय होईल, असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला आहे.

वसंत मोर म्हणाले, सोयीनुसार प्रभाग रचना बदलली जात आहे. तुम्ही केतीही तोडा आणि फोडा आम्ही लढायला तयार आहोत. हिंमत असेल तर निवडणुकांना सामोरे जा. महापौरांची निवडही जनतेतून करा, पुढचा महापौर हा मनसेचाच असेल.

मोरे म्हणाले, महाविकास आघाडीने फेब्रुवारीतच महापालिका निवडणुका घ्यायला हव्या होत्या. यावेळी सरकारने तीन सदस्यीय प्रभाग प्रक्रिया पूर्ण केली, त्यानुसार मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या इतकेच नाही तर मतदार केंद्रांचीही पाहणी झाली. असे असतांना शिंदे फडणवीस यांनी हा निर्णय रद्द करून आता नव्याने चार सदस्यांचा प्रभाग तयार करण्याचा घाट घातला आहे. हे करताना सामान्य जनतेचा विसर त्यांना पडला आहे. ते फक्त सत्तेचा विचार करत आहेत. मात्र नागरिकांच्या कामांचा विचार कुणी करत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वी शिंदे सरकारने महानगरपालीची वॉर्ड रचना ही २०१७ प्रमाणे राहील अशी घोषणा करत नव्या रचना रद्द केल्या होत्या. यामुळे मुंबईत शिवसेनेला तर पुण्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसल धक्का बसला होता. त्यामुळे मनसे आणि भाजपची जवळीक एकीकडे वाढत असताना पुण्यात मात्र, वसंत यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे.

IPL_Entry_Point

विभाग