मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Amit Thackeray: आरे मेट्रो कारशेडला मनसेचाही विरोध, अमित ठाकरे यांची पोस्ट

Amit Thackeray: आरे मेट्रो कारशेडला मनसेचाही विरोध, अमित ठाकरे यांची पोस्ट

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jul 02, 2022 05:59 PM IST

Amit Thackeray against Metro Car Shed in Aarey: मुंबईतील आरेच्या जंगलात मेट्रोची कार शेड उभारण्याच्या नव्या सरकारच्या निर्णयाला मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी देखील विरोध दर्शवला आहे.

Amit Thackeray
Amit Thackeray

MNS Opposes Metro Carshed in Aarey: मुंबईतील आरे कॉलनीत मेट्रोची कारशेड उभारण्याच्या एकनाथ शिंदे सरकारच्या निर्णयाला मनसेनं विरोध दर्शवला आहे. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी या संदर्भात फेसबुकवर एक खरमरीत पोस्ट लिहिली आहे. राजकारण्यांनी किमान भान बाळगायला हवं, असं त्यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात आरेतील मेट्रो कारशेड हा राजकीय वादाचा विषय झाला होता. शेकडो झाडांची कत्तल करून आरेमध्ये कारशेड उभारण्यास शिवसेनेनं विरोध दर्शवला होता. सरकारमध्ये सहभागी असूनही शिवसेनेनं ही भूमिका घेतली होती. त्यावरून शिवसेना-भाजपमध्ये मतभेद झाले होते. पर्यावरणवाद्यांनीही शिवसेनेला साथ दिली होती. फडणवीस सरकार जाऊन राज्यात आलेल्या महाविकास आघाडी सरकारनं आरेत कारशेड उभारण्याचा निर्णयच रद्द केला होता. त्याऐवजी कांजूरमार्ग इथं कारशेडचा प्रस्ताव होता. मात्र, ती जागा केंद्राची असल्याचा दावा करण्यात आल्यानंतर कारशेडचं काम रखडलं होतं. आता भाजपच्या पाठिंब्यावर सत्तेत आलेल्या शिंदे सरकारनं पुन्हा एकदा कारशेड आरेतच उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन या निर्णयास विरोध दर्शवला. त्यानंतर आज मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. ‘मेट्रो कारशेड आरेतच करण्याच्या नव्या सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळं माझ्यासारख्या अनेक पर्यावरणप्रेमींना धक्का बसला आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण-तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड केलं होतं, याची आठवण अमित ठाकरे यांनी करून दिली आहे.

'आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपलं पर्यावरण उद्ध्वस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचं भान सर्व राजकारण्यांनी बाळगायला हवं. नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेड बाबतच्या आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंतीही अमित यांनी केली आहे.

<p>Aarey</p>
Aarey
IPL_Entry_Point

संबंधित बातम्या