मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray plane : राज ठाकरे यांच्या आलिशान विमानाची सर्वत्र चर्चा; एलॉन मस्क आणि ट्रम्प यांच्याशी होतेय तुलना

Raj Thackeray plane : राज ठाकरे यांच्या आलिशान विमानाची सर्वत्र चर्चा; एलॉन मस्क आणि ट्रम्प यांच्याशी होतेय तुलना

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 22, 2024 02:37 PM IST

Raj Thackeray Chartered Plane News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चार्टर्ड विमानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विमानाची तुलना एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानाशी होत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विमानाची तुलना एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानाशी होत आहे. (Hindustan Times)

Raj Thackeray News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. यावेळी राज ठाकरे यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राज ठाकरे मुंबईत परतले असले तरी त्यांच्या दौऱ्याची चर्चा सुरूच आहे. लवकरच राज ठाकरे एनडीएमध्ये सामील होतील, असे बोलले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. सध्या राज ठाकरे ज्या चार्टर्ड विमानाने गेले, त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या विमानाची खासियत जाणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

राज ठाकरेंच्या या विमानात कस्टमाईज्ड केबिनपासून मॉडर्न गॅलरी, वायरलेस इंटरनेट, ॲडजस्टेबल रिक्लाइनिंग सीट, दिवाण बेड अशा लक्झरी सुविधा आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Flightradar24, Flyware आणि Airnav Radarbox सारखे फ्लाइट ट्रॅकिंग प्लॅटफॉर्म देखील राज ठाकरे यांच्या विमानाला ट्रॅक करू शकले नाहीत. यामुळे राज ठाकरे यांचे विमान अधिक चर्चेत आले आहे. एलन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प सारख्या लोकांसह जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींचे विमान ट्रॅक करू शकत नाही.

राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार

राज ठाकरे यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. अमित शाह यांच्या भेटीनंतर राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीत सहभागी झाल्यास रणनीती काय असेल? यावर या बैठकीत चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लोकसभा निवडणुकीऐवजी मनसे विधानसभा निवडणुकीला महायुतीत एकत्र दिसण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point

विभाग