मुंबईत चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे आक्रमक,सरकारला दिला इशारा
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईत चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे आक्रमक,सरकारला दिला इशारा

मुंबईत चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे आक्रमक,सरकारला दिला इशारा

Nov 26, 2024 10:11 PM IST

Mumbai Minor Girl Rape Case: मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात चार वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवर अमित ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.

मुंबईत चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे आक्रमक
मुंबईत चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे आक्रमक

Mumbai Rape News: मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात काल चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली. याप्रकरी अँटॉप हिल पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कारवाई सुरुवात केली. या घटनेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त करून कठोर कारवाईची मागणी केली. अन्यथा मनसे अशा नराधमांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही, असाही त्यांनी सरकारला इशारा दिला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सायन कोळीवाडा परिसरातील रहिवाशी आहे. दरम्यान, सोमवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास पीडिताच्या आईने तिला बाहेरून काहीतरी आणायला सांगितले. मात्र, पीडिता परिसरातील इतर मुलांसोबत खेळण्यासाठी थांबली. त्यावेळी आरोपीने पीडिताला उचलून एका निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर अत्याचार केले. ज्यावेळी ही घटना घडली, तेव्हा आरोपीने ड्रग्जचे सेवन केले होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. पीडितावर सायन रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. या घटनेच्या निषेधार्थ अमित ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.

'हे' फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे!, अशा कॅप्शनसह अमित ठाकरे यांनी फेसबूकवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये अमित ठाकरे म्हणाले की, 'सायन कोळीवाड्यातील पंजाब कॉलनीत काल रात्री घडलेल्या एका भयंकर घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीवर ड्रग्सच्या नशेत असलेल्या नराधम अनिल गुप्ताने अमानुष अत्याचार केला. आज ती चिमुकली सायन रुग्णालयात जीवनमरणाच्या झुंजीत आहे. हा केवळ एका चिमुकलीवर नाही, तर आपल्या समाजाच्या संवेदनांवर झालेला आघात आहे.'

पुढे अमित ठाकरे म्हणाले की, 'मुंबईसह इतर शहरांमध्ये दिवसेंदिवस ड्रग्सचं प्रमाण वाढतं आहे, अनेक घरं उद्ध्वस्त होत आहेत. महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. दादर, सायनसारख्या भागातही ड्रग्सच्या विळख्यात गर्दुल्यांची संख्या वाढली असून महिलांनी याबाबत माझ्याकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत. कालच भारतीय नौसेनेकडून अंदमान समुद्रात ५ टन ड्रग्स वाहून नेणाऱ्या मच्छीमार बोटीवर कार्यवाही करण्यात आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स भारतात येतं कुठून? ते पोहोचतं कुठे? आणि याच्या पाठीमागे असलेला सूत्रधार कोण? या प्रश्नांची उत्तरं मिळवणं आणि ड्रग्सचं नेटवर्क मोडून काढणं आता अत्यावश्यक झालं आहे.'

'मनसेने सुरुवातीपासूनच अशा नराधमांवर कठोर कारवाईसाठी भूमिका घेतली आहे. म्हणूनच माझ्या वचननाम्यात मी ड्रग्स विक्री, सेवन करणाऱ्यांवर कठोर उपाययोजना करण्याचं वचन दिलं होतं आणि आज त्या दिशेनं पाऊलं टाकत आहे.

सायनमधील या नराधमाला अटक झाली असली, तरी फक्त अटक पुरेशी नाही. काही महिन्यांपूर्वी सायन रुग्णालयात महिला डॉक्टरवर मद्यधुंद पेशंटने अतिप्रसंग केल्याची घटना समोर आली होती. या सगळ्याचा तपास जलदगतीने आणि प्रभावी पद्धतीने पूर्ण झालाच पाहिजे. आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेतून कडक शिक्षा झालीच पाहिजे', अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

 

'या प्रकरणात ठोस कारवाई झाली नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा नराधमांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही! हे फक्त शब्द नाहीत, तर इशारा आहे. मुलींच्या सुरक्षिततेसाठी, ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी मनसेचा संकल्प अटळ आहे. आपण सगळ्यांनी एकत्र उभे राहून या नराधमांना आणि त्यांच्या समर्थकांना जशास तसे उत्तर देण्याची आता वेळ आली आहे, असेही अमित ठाकरे म्हणाले.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर