Gandhi Jayanti : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गांधी जयंती निमित्त लिहिली विचार करायला लावणारी पोस्ट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Gandhi Jayanti : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गांधी जयंती निमित्त लिहिली विचार करायला लावणारी पोस्ट

Gandhi Jayanti : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गांधी जयंती निमित्त लिहिली विचार करायला लावणारी पोस्ट

Published Oct 02, 2024 12:51 PM IST

Raj Thackeray on Gandhi Jayanti : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे.

हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल; जयंती निमित्त अभिवादन करताना काय म्हणाले राज ठाकरे?
हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल; जयंती निमित्त अभिवादन करताना काय म्हणाले राज ठाकरे?

Raj Thackeray on Gandhi Jayanti : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विविध स्तरांतून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. गांधीजींच्या विचारांचा जागर केला जात आहे. देशातील राजकीय नेते गांधीजींना श्रद्धांजली वाहत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिहिलेल्या फेसबुक पोस्टनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.

महात्मा गांधी यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करणारी पोस्ट राज ठाकरे यांनी लिहिली आहे. या पोस्टमधून त्यांनी राजकारण्यांना टोले हाणले आहेत. राज ठाकरे म्हणतात…

आज महात्मा गांधींची जयंती. 'बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरूर बोला', असं गांधीजी म्हणायचे.

त्यांच्या या म्हणण्यातला 'मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर....' याचा खोल अर्थ मात्र हल्ली समजेनासा झाला आहे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक गोष्टीवर कुठलाही विचार पूर्ण व्हायच्या आत व्यक्त व्हायचं, हे सध्या सुरू आहे.

आणि महाराष्ट्रात वाचाळवीरांना तर फारच बरे दिवस आलेत. काहीही बोललं, कितीही बेताल वक्तव्य केली तरी प्रसिद्धी मिळते हे माहित झाल्यामुळे, असल्यांचा सुळसुळाट झाला आहे. आणि हे होतंय कारण माध्यमं यांना प्रसिद्धी देतात. आणि त्यात भर पुन्हा सोशल मीडियाची.

या सगळ्यात ठेहराव निघून जातो, विचार उरत नाही. त्यामुळे माध्यमांनी पण या क्षणापुरता न विचार करता, पुढच्या अनेक दशकांसाठी आपण काय पेरतोय याचा विचार करायला हवा.

गांधीजींनी रुजवलेला विचार पुसणं शक्य नाही!

'गांधीजींनी जो विचार रुजवला, तो त्यांच्या नंतर ७५ वर्षांनी देखील पुसणं शक्य नाही, कारण तो मंथनातून निर्माण झाला होता. याचं महत्व पटणं आणि सारखं व्यक्त होण्याची उर्मी मनातून रिक्त होणे, हीच गांधीजींना खरी श्रद्धांजली ठरेल, असं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये शेवटी म्हटलं आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर