Raj Thackeray Panvel : ‘फोडाफोडी न करता पक्ष उभा करायला शिका’, राज ठाकरेंचा भाजपला खोचक टोला-mns chief raj thackeray live speech from panvel mumbai see details ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray Panvel : ‘फोडाफोडी न करता पक्ष उभा करायला शिका’, राज ठाकरेंचा भाजपला खोचक टोला

Raj Thackeray Panvel : ‘फोडाफोडी न करता पक्ष उभा करायला शिका’, राज ठाकरेंचा भाजपला खोचक टोला

Aug 16, 2023 02:14 PM IST

Raj Thackeray Speech In Panvel : राज्यातील अनेक महामार्गांच्या खराब स्थितीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

raj thackeray devendra fadnavis
raj thackeray devendra fadnavis (HT)

Raj Thackeray Speech On BJP : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांकडून लवकरच अखेरचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळं राज्याचा मुख्यमंत्री बदलणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच आता पनवेलमध्ये आज मनसेचा निर्धार मेळावा पार पडला आहे. त्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप-शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. फोडाफोडीचं राजकारण, समृद्धी महामार्गावरील अपघात आणि मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे या मुद्द्यांवर राज ठाकरेंनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं. त्यामुळं आता यावरून भाजप आणि मनसेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.

पनवेलमधील मनसेच्या निर्धार मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच चांद्रयाण चंद्रावर गेलं आहे, पण त्यामुळं आपला काय फायदा झाला?, जर खड्डेच पाहायचे होते, तर चंद्रयाणाला महाराष्ट्रात पाठवायला हवं होतं. कारण केवळ कोकणचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. समृद्धी महामार्गावर शेकडो लोकांचे प्राण जात आहे. तर दुसरीकडे मुंबई-गोवा महामार्गाचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नसल्याचं सांगत राज ठाकरे यांनी राज्य तसेच केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. याशिवाय राज्यातील सर्वच पक्षांनी तुमचा भ्रमनिरास केला तरी तुम्ही त्यांना परत कशाला मतदान करता?, असाही सवाल राज ठाकरेंनी मतदारांना केला आहे.

सत्ताधारी भाजपने दुसऱ्या पक्षांचे आमदार न फोडता स्वत:चा पक्ष वाढवून दाखवावा. दुसऱ्या पक्षातील लोकांच्या गनपट्टीवर बंदुका ठेवून त्यांना पक्षात प्रवेश द्यायचा आणि ते आले की गाडीतून झोपून जातील, असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपसह अजित पवारांना टोला हाणला आहे. राज्यात सध्या अनेक नेते व पक्षांकडून निर्लज्जपणाचा कळस सुरू आहे. अनेक लोक राज्याचा विकास करण्यासाठी पक्ष बदलत असल्याचं सांगतात, अरे कशाला खोटं बोलताय?, असा सवाल करत राज ठाकरेंनी दलबदलूंवर जोरदार टीका केली आहे.