konkan graduate constituency : राज्यात लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. एनडीए सरकार स्थापन करण्याच्या दिशेने जात आहे. राज्यात आता राजकीय पक्षांना विधान परिषद निवडणुकीचे वेध लागले आहेत. कोकण व मुंबई पदवीधर तसेच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ठाकरे गटाने उमेदवार जाहीर केले आहे. तर मनसेने देखील कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे यांना उमेदवारी जाहीर केली. होती. दरम्यान ते उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत असतांना अचानक मनसेने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी या बाबत माहिती दिली आहे.
लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या गटात सहभाग घेतला होता. त्यांनी त्यांना पाठिंबा जाहीर केला होता. यानंतर मनसेने भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहिर केली होती. त्यामुळे भाजपचे टेंशन वाढले होते. येथील सामना मनसे आणि भाजप असा रंगणार अशी चर्चा असतांना काल देवेंद्र फडणवीस यानी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. फडणवीस ही राज ठाकरे यांची मनधरणी करण्यात यशस्वी ठरले असून त्यांनी आता कोकण पदवीधर निवडणुकीतून माघार घेतली आहे.
या पूर्वी देखील भाजपने राज ठाकरे यांची समजूत काढण्यासाठी निरंजन डावखरे व प्रसाद लाड यांना राज ठाकरेंचे निवासस्थान शिवतिर्थावर पाठवले होते. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. आज सकाळी प्रसाग लाड व निरंजन डावखरे यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली असून राज ठाकरे यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. कोकण पदवीधर मतदार संघातून भाजपचे निरंजन डावखरे हे रिंगणात उतरले आहेत.
राज्यात आता विधानसभेच्या निवडणुकीची चाहूल लागली आहे. महाविकास आघाडीचे यश पाहून आता सर्व पक्ष तयारीला लागले आहे. त्यात विधान परीक्षेच्या जागेवरून मनसे आणि भाजपमध्ये तणाव सुरू झाला होता. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यानी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. दरम्यान, या निवडणुकीतही राज ठाकरे साथ देतील अशी अपेक्षा भाजप नेत्यांना होती. यामुळे भाजपकडून कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत डावखरे यांना उमेदवारी जाहिर झाली होती. तर मनसेने देखील अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे चर्चा सुरू झाल्या होत्या. राज ठाकरे यांच्या उमेदवारायमुळे भाजपची कोंडी होणार होती. त्यामुळे मनसेने या निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू होते.