महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होताचमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. काही झालं तरी मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नाही, असं राज ठाकरे यांनी पुन्हा म्हटलं आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारेमनोज जरांगे यांच्यासह त्यांना आश्वासन देणाऱ्या सगळ्याच पक्षांनाराज यांनीफटकारले आहे.
आरक्षण देणं शक्य नाही हे सगळ्यांना माहीत आहे पण फक्त बोलायची हिंमत फक्त माझ्यात आहे. मतांसाठी आज तुम्हाला भूलथापा देत आहेत. माझी इच्छा आहे कोणताही समाज हा हाताला कामाशिवाय राहू नये, असे म्हणत राज ठाकरे यांनी मुंबई गोरेगाव येथील राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यातील आपल्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
गोरेगाव येथील मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले होते की, मुख्यमंत्री शिंदे मराठा समाजाला आरक्षण देऊच शकत नाही. त्यांच्याकडे तेवढी पॉवरच नाही. राज्य सरकारला आरक्षणाचा निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
राज यांनी यांनी मराठा आरक्षणाबाबत याआधीही आपली भूमिका स्पष्ट केली होती.आरक्षण मिळू शकत नाही. ही गोष्ट होऊ शकत नाही. हे प्रत्येकाला माहिती आहे. मनोज जरांगे उपोषणाला बसले त्यावेळी त्यांनाही जाऊन सांगितलं की, हा किचकट आणि तांत्रिक विषय आहे. देशाच्या राज्य घटनेशी जोडला आहे. हा विषय केवळ एका राज्याशी नाहीतर संपूर्ण देशातील राज्यातील इतर जात समूहाशी देखील जोडला गेलेले विषय आहे.
राज ठाकरे म्हणाले, "मराठवाड्यात गेलो होतो. तिथं मराठा आरक्षणा देण्याची मागणी केली. मी मराठा आरक्षणावर पूर्वीच भूमिका मांडली आहे. मी असे आश्वासन देतो जे पूर्ण करू शकतो. महाराष्ट्रात माझी धमक आहे. मी जो शब्द देईल, तो पूर्ण करू शकतो. माझ्या हातात सत्ता द्या, राज्यातील एकही तरुण, तरुणी कामाशिवाय राहणार नाही. प्रत्येकाच्या हाताला काम असेल, पण ते जातीप्रमाणे दिलं जाणार नाही.
आरक्षण मिळू शकत नाही, ही गोष्ट होऊ शकत, हे सर्वांना माहीत आहे. मात्र हे उघड बोलण्याचे धाडस फक्त राज ठाकरेमध्ये आहे. जर ती गोष्ट होऊच शकत नाही. ती आपण का समजावून घेऊ शकत नाही, हेच मला कळत नाही. कोणताही समाज, जात हाताला कामाशिवाय राहू नये, ही माझी भावना आहे. पण सर्व राजकीय पक्ष भूलथापा मारत आहे. मतांसाठी खोटं सांगितलं जात आहे.
संबंधित बातम्या