मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे शिवाजी पार्कवर एकाच मंचावर? राज ठाकरेंनी केला खुलासा

Raj Thackeray : नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे शिवाजी पार्कवर एकाच मंचावर? राज ठाकरेंनी केला खुलासा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 18, 2024 11:05 PM IST

Raj Thackeray : पंतप्रधान मोदी व राज ठाकरे एकाच मंचावर येणार असून शिवाजी पार्कवर दोघांची सभा होणार असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत आता स्वत: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे शिवाजी पार्कवर एकाच मंचावर? 
नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे शिवाजी पार्कवर एकाच मंचावर? 

मनसे प्रमुख राज ठाकरे व नरेंद्र मोदी मुंबईत एकाच व्यासपीठावर येणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मनसे नेते अमित ठाकरे बुधवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना पंतप्रधान मोदी व राज ठाकरे एकाच मंचावर येणार असून शिवाजी पार्कवर दोघांची सभा होणार असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत आता स्वत: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.

राज ठाकरे यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिले आहे. ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, काल एका वृत्तवाहिनीवर, अमितशी झालेल्या अनौपचारिक गप्पांचा दाखला देत, ‘राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान एका व्यासपीठावर दिसणार अशी बातमी चालवली. मुळात अमितने असं कोणतंही विधान केलेलं नाही, असं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अमित काल पुण्याच्या दौऱ्यावर होता आणि तिथे पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळेस अमितने वरील विधान केल्याचा दावा एकाच वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी केला. इतर कुठल्याच पत्रकाराने ही बातमी का नाही केली? तिथे इतरही अनेक पत्रकार होते पण कोणीच ही बातमी केली नाही, याचं कारण अमितने असं विधान केलंच नाही, असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.

अनौपचारिक गप्पा या अनौपचारिकच ठेवायच्या असतात आणि त्यात न केलेली विधानं तोंडात कोंबायची नसतात हा संकेत असतो. असो. सर्व माध्यमांनी या बातमीकडे साफ दुर्लक्ष करावं,अशी विनंतीही राज ठाकरे यांनी केली आहे.

बुधवारी मनसे नेते अमित ठाकरे पुणे दौऱ्यावर होते. यावेळी पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी पंतप्रधान मोदी व राज ठाकरे एकाच मंचावर येणार असल्याची माहिती दिल्याची बातमी समोर आली होती.

मुंबईत पार पडलेल्या मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले. त्यावेळी लवकरच प्रचारसभा घेणार असल्याचेही सांगितले होते. यामुळे अमित ठाकरे यांनीही याबाबत माहिती दिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या.

IPL_Entry_Point