मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक, डिस्ने प्लस हॉटस्टारच्या कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांचा जोरदार राडा!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक, डिस्ने प्लस हॉटस्टारच्या कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांचा जोरदार राडा!

मराठीच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा आक्रमक, डिस्ने प्लस हॉटस्टारच्या कार्यालयात घुसून कार्यकर्त्यांचा जोरदार राडा!

Jan 27, 2025 05:23 PM IST

MNS Protest : मराठी समालोचनाच्या मुद्यावरुन मनसेचे पदाधिकारी आज थेट हॉटस्टारच्या लोअर परळ येथील कार्यालयात धडकले. हॉट स्टार कंपनीचे वरिष्ठ अधिकारी भेट देत नसल्याने काही काळ तणावाचं वातावरण झालं होतं. मात्र पोलीस फौजफाटा उपस्थित असल्यानं परिस्थिती नियंत्रणात राहिली.

मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा आक्रमक
मराठीच्या मुद्द्यावरुन मनसे पुन्हा आक्रमक

Mns Aggressive Over Marathi : मराठीच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसत आहे. डिस्ने प्लस हॉट स्टारच्या ॲपवर  क्रिकेटचे समालोचन अन्य प्रादेशिक भाषांत उपलब्ध आहे, मात्र मराठीत नसल्याने मनसे कार्यकर्त्यांनी थेट कंपनीचं कार्यालय गाठून निषेध नोंदवला. यावेळी मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, संतोष धुरी तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली .

मराठी समालोचनाच्या मुद्यावरुन मनसेचे पदाधिकारी आज थेट हॉटस्टारच्या लोअर परळ येथील कार्यालयात धडकले. मनसे नेते अमेय खोपकर यांनी कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांना हॉटस्टारवर मराठी समालोचन का नाही? हा जाब त्यांनी सबंधित अधिकाऱ्यांना विचारला. पोलीस देखील कार्यालयात उपस्थित आहेत. 

हॉट स्टार कंपनीचे वरिष्ठ अधिकारी भेट देत नसल्याने काही काळ तणावाचं वातावरण झालं होतं. मात्र पोलीस फौजफाटा उपस्थित असल्यानं परिस्थिती नियंत्रणात राहिली. अमेय खोपकर यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन लवकरात लवकर ॲपवर मराठीत समालोचन उपलब्ध करण्याची मागणी केली.

महाराष्ट्रात कार्यालय असून येथे व्यवसाय करुन डिस्ने हॉटस्टारच्या ॲपवर क्रिकेटचं समालोचन  इंग्रजी हिंदीसह, गुजराती, मल्याळी, तेलुगु, भोजपुरी या प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. पण मराठीत उपलब्ध नाही. हे यापुढे अजिबात चालणार नाही. मराठीत समालोचन तातडीने उपलब्ध झालं पाहिजे. नाहीतर डिस्ने हॉटस्टारच्या कार्यालयातील काचा खूप महाग आहेत हे लक्षात ठेवा, असा इशारा खोपकर यांनी कंपनीला दिला.

अमेय खोपकरानी मंत्री उदय सामंत यांना तेथूनच फोन लावून त्यांना सांगितले की, हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांकडून मराठी भाषेची अमलबजावणी होईल असे लेखी पत्र घ्या. खोपकर यांनी सांगितले की, उदय सामंत यांनी मनसेच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. मराठी भाषेत समालोचन का नसावे? हे कोण ठरवणारे, बाकीच्या भाषांत समालोचन असताना यांना मराठीचे काय वावडे आहे, असा संताप खोपकरांनी व्यक्त केला. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर