CNG Price Hike: पुणेकरांच्या खिशावर ताण, सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ; वर्षभरात चौथ्यांदा दरवाढ
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  CNG Price Hike: पुणेकरांच्या खिशावर ताण, सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ; वर्षभरात चौथ्यांदा दरवाढ

CNG Price Hike: पुणेकरांच्या खिशावर ताण, सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ; वर्षभरात चौथ्यांदा दरवाढ

Dec 29, 2024 09:50 AM IST

CNG Prices in Pune: आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामन्य नागरिकांच्या खिशावर आणखी ताण पडणार आहे. सीएनजीच्या दरवाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे वाढण्याची शक्यता आहे.

पुणेकरांच्या खिशावर ताण, सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ
पुणेकरांच्या खिशावर ताण, सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

Pune CNG Price News: पुणेकरांच्या खर्चामध्ये आणखी वाढ होणार आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (MNGL) पुण्यातील कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (CNG) दरात मध्यरात्रीपासून प्रतिकिलो १.१० रुपयांची वाढ केली आहे. २०२४ मधील ही चौथी दरवाढ आहे. वर्षभरात सीएनजीच्या दरात एकूण ५.५० रुपये प्रति किलोग्रॅम वाढ झाली आहे.याआधी पुण्यात सीएनजी ८७.९० प्रतिकिलो इतकी होती. आता पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यात सीएनजीचे नवीन दर ८९ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.

एमएनजीएलने शनिवारी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सीएनजीची सुधारित किरकोळ किंमत २८ डिसेंबर २०२४ पासून ८९ रुपये प्रतिकिलो असेल. जागतिक ऊर्जा बाजारातील चढउतार आणि आयात केलेल्या नैसर्गिक वायूच्या वाढत्या किंमतीमुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे गॅस वितरण कंपनीने म्हटले आहे. या दरवाढीनंतरही सीएनजी पेट्रोलपेक्षा ४० टक्के आणि डिझेलपेक्षा २० टक्क्यांहून अधिक स्वस्त आहे.

आयात नैसर्गिक वायूच्या किंमतीत झालेली झपाट्याने वाढ आणि बाजारातील दरांवर आधारीत पुरवठा यांचे संतुलन करण्याचे मोठे आव्हान एमएनजीएलसमोर असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या वाढीमध्ये उत्पादन शुल्क आणि राज्य वॅटचा समावेश असेल, जे एकूण वाढीपैकी सुमारे १५ टक्के आहे.

सीएनजीचे इतर शहरातील ताजे दर

अहमदनगर- ९१.५० रुपये प्रति किलो, अकोला- ८३.९५ रुपये प्रति किलो, अमरावती- ८३.९५ रुपये प्रति किलो , औरंगाबाद- ८६.५० रुपये प्रति किलो, भंडारा- ८८.५० रुपये प्रति किलो, बुलढाणा- ९१.५० रुपये प्रति किलो, चंद्रपूर- ९१.५० रुपये प्रति किलो, धुळे- ६७.९० रुपये प्रति किलो, गडचिरोली- ८८.०० रुपये प्रति किलो, गोंदिया- ८८.०० रुपये प्रति किलो, हिंगोली-८३.४५ रुपये प्रति किलो, जळगाव- ८८.०० रुपये प्रति किलो, जालना- ८८.०० रुपये प्रति किलो.

गेल्या महिन्यात मुंबईसह उत्तर प्रदेशातील नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद आणि हरियाणातील गुरुग्राममध्येही सीएनजीच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात आली होती. महानगर गॅस लिमिटेड आणि अदानी टोटल गॅस लिमिटेडसारख्या मुंबईतील इतर गॅस किरकोळ विक्रेत्यांनी इनपुट कॉस्टमध्ये २० टक्के वाढ करूनही गेल्या दोन महिन्यांपासून किरकोळ किमती तशाच ठेवल्या होत्या. प्रति किलो दोन रुपयांनी वाढल्यानंतर मुंबईत सीएनजीचे दर ७७ रुपये झाले होते.

व्हॅटसारख्या स्थानिक करांच्या घटनांनुसार सीएनजीचे दर प्रत्येक राज्यात बदलतात. एमजीएल आणि आयजीएलने सीएनजी दरवाढीचे कारण सांगितले नसले, तरी रेग्युलेटेड किंवा एपीएम गॅसच्या पुरवठ्यात सलग दोन वेळा झालेल्या कपातीमुळे कंपन्यांना अधिक पैसे देऊन गॅस खरेदी करावा लागत आहे. त्यामुळे ही दरवाढ आवश्यक असल्याचे सूत्रांनी सांगितले. एमजीएलचा दावा आहे की, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींच्या तुलनेत सीएनजीमुळे अनुक्रमे ४९ टक्के आणि १४ टक्के बचत होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर