Mlc election result 2024 : मुंबई पदवीधर मतदारसंघातून उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनिल परब हे विजयी झाले आहेत. विधान परिषदेच्या चारही जागांचे कल हाती आले असून मुंबईतून अनिल परब यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. परब यांच्या विजयानंतर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जल्लोष सुरू केला आहे.
विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघशिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. हीच परंपरा यावेळीही कायम राहिली. या मतदारसंघातूनअनिल परब विजयी झाले आहेत. अनिल परब यांना आतापर्यंत ४४,७९१ मते मिळवून विजयी होण्यासाठी मतांचा कोटा पूर्ण केला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपच्या किरण शेलार यांना १८,७७१ मते मिळाली असून अनिल परब२६हजार२०मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे ठाकरे गटाकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे.
अनिल परब यांना मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली होती. आता भाजप व शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या मतांमध्ये मोठा फरक पडला असून पहिल्या २ फेरीतच अनिल परब यांनी मतांचा कोटा पूर्ण केला. मतमोडणीच्या ४ फेऱ्या होणार आहेत.
मुंबई पदवीधर मतदारसंघात दीड लाखांच्या आसपास मतदार आहेत. भाजपचे उमेदवार किरण शेलार आणि अनिल परब यांच्यात सामना झाला. शेलार यांच्यासाठी भाजपने मुंबईतील आपली सर्व यंत्रणा कामाला लावली होती. मात्र,त्यानंतरही अनिल परब यांनी गड शाबूत ठेवण्यात यश मिळवलं आहे.
विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक व नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी आज सकाळी ८ पासून मतमोजणीस सुरूवात झाली. या निवडणुकांसाठी २६ जूनला मतदान झाले होते. आज सकाळी ८ पासून मुंबईतील कोकण भवन इथे मुंबई, कोकण पदवीधर तर शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाली आहे, तर नाशिकसाठी नाशिक येथे मतमोजणीस झाली.
मुंबई पदवीधर मतदार संघात उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब व भाजपचे किरण शेलार यांच्यात थेट लढत होती. तर कोकण पदवीधरमध्ये भाजपचे निरंजन डावखरे व काँग्रेसच्या रमेश कीर यांच्यात लढत होती. मुंबई शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ज.मो. अभ्यंकर विरुद्ध भाजपचे शिवनाथ दराडे, नाशिकमध्ये किशोर दराडे (शिंदे गट) विरुद्ध संदीप गुळवे (ठाकरे गट) हे निवडणूक रिंगणात होते.