Pune Accident : पुणे अपघात प्रकरणी अजितदादांचा आमदार गोत्यात! ससुनच्या 'त्या' डॉक्टरची केली होती शिफारस, पत्र व्हायरल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident : पुणे अपघात प्रकरणी अजितदादांचा आमदार गोत्यात! ससुनच्या 'त्या' डॉक्टरची केली होती शिफारस, पत्र व्हायरल

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणी अजितदादांचा आमदार गोत्यात! ससुनच्या 'त्या' डॉक्टरची केली होती शिफारस, पत्र व्हायरल

Published May 28, 2024 06:14 AM IST

Pune Porsche Accident : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी अजित पवार यांचा आमदार पुन्हा गोत्यात आला आहे. अपघाताच्या दिवशी पोलिस ठाण्यात गेल्यामुळे आणि आता आरोपी मुलाचा ब्लड रिपोर्ट बदलणाऱ्या डॉक्टरची शिफारस या आमदाराने केल्याचे पुढे आले आहे.

ससुनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करावी अशा आशयाचे शिफारस पत्र हे अजित पवार गटाचे आमदार सुनील टींगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिले असल्याचे उघड झाले आहे.
ससुनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करावी अशा आशयाचे शिफारस पत्र हे अजित पवार गटाचे आमदार सुनील टींगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिले असल्याचे उघड झाले आहे.

Pune Accident Case, Dr. Ajay Taware and Sunil Tingare : पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणी अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहे. यात अनेक जण गोत्यात येत आहे, पुणे पोलिसांनी या प्रकरणी तपास वेगाने सुरू केला आहे. सोमवारी पुणे पोलिसांनी आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने बदलणाऱ्या ससुनच्या दोन बड्या डॉक्टरांना अटक केली आहे. ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांनी हे नमुने बिल्डर विशाल अगरवाल याच्या मुलाला वाचवण्यासाठी कचऱ्यात फेकल्याचे तपासात पुढे आले आहे.

Asaduddin Owaisi on Modi : "तुम्ही चीनसोबत डिस्को डान्स करत आहात', पंतप्रधान मोदींच्या ‘मुजरा’ वर ओवैसींचा पलटवार

दरम्यान, या डॉक्टरला ससुनच्या अधीक्षकपदी नियुक्ती करावी अशा आशयाचे शिफारस पत्र हे अजित पवार गटाचे आमदार सुनील टींगरे यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना लिहिले असल्याचे उघड झाले आहे. हे पत्र सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. आधी पोलिस ठाण्यात गेल्याने आणि आता हे पत्र पुढे आल्याने सुनील टिंगरे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

इंदूर शहरात २५८ मंदिर, मशिदी, गुरुद्वारांवरील तब्बल ४३७ लाऊडस्पीकर हटवले; जिल्हाधिकाऱ्याच्या निर्णयावर आक्षेप

पुण्यात १९ मे रोजी कल्याणी नगर येथे एका पब पुढे विशाल अगरवाल या बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत भरधाव वेगात गाडी चालवत दोघांचा जीव घेतला. यानंतर या प्रकरणातून या बिल्डर पुत्राला वाचवण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लागली. यात सुरवातीला आमदार टींगरे हे पोलिस ठाण्यात पोहचले आणि त्यांनी पोलीसांवर दबाव आणल्याचा आरोप केला केला. यात त्यांचा काही संबंध नसल्याचे टिंगरे यांनी खुलासा केला. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी आता पर्यंत ७ जणांना अटक केली आहे. सोमवारी पुणे पोलिसांनी या प्रकरणी ससुनचे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांच्यासह शिपाही अतुल घटकांबळेला अटक केली आहे. या दोघांनी बिल्डर पुत्राला रक्ताच्या नमूना चाचणीसाठी ससुनमध्ये आणले होते. यावेळी त्यांनी बिल्डर कडून आर्थिक व्यवहार करून मुलाला वाचवण्यासाठी त्याचे रक्ताचे नमुने कचऱ्यात फेकून देऊन दुसरे नमुने तयार केले. ही बाब पुणे पोलिसांच्या तपासात उघड झाल्याने त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ३० मे पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.

Porsche crash : रक्ताचे नमुने बदलण्याचा डॉक्टर व आरोपीच्या वडिलाचा खेळ पोलिसांनी कसा उलटवला?

दरम्यान, आमदार सुनील टिंगरे यांनी ससुनचे फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे यांना ससुनचे अधीक्षक करण्यात यावे यासाठी वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांना डॉ. तावरे यांच्यासाठी शिफारस पत्र दिल्याचे पुढे आले आहे. हे पत्र सोशल मिडियावर आता व्हायरल होत आहे. २९ डिसेंबर २०२३ रोजी अजय तावरे यांनी ससूनच्या अधीक्षकपदाची सूत्रे हाती घेतली होती. तावरे हे न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख होते. डॉ. अजय तावरे यांच्या नियुक्तीसाठी अजितदादा गटाचे आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारस पत्र दिले होते. तर हसन मुश्रीफ यांनीही तावरे यांच्या नियुक्तीचे पत्र दिले होते.

या पूर्वी टिंगरे हे या प्रकरणी पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, असे काही ही न केल्याचे अपघाताची माहिती घेण्यासाठी पोलीस ठाण्यात गेल्याचे सुनिल टिंगरे यांनी खुलासा करतांना संगितले होते. मात्र, डॉ. तावरे यांच्या नावाची शिफारस केल्याने आता त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर