मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Politics : आमदार सदा सरवणकरांच्या कार्यालयावर दगडफेक, पोस्टर्स फाडले, दादरमध्ये तणाव

Mumbai Politics : आमदार सदा सरवणकरांच्या कार्यालयावर दगडफेक, पोस्टर्स फाडले, दादरमध्ये तणाव

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 11, 2022 03:37 PM IST

Shivsena vs Shinde Group In Mumbai : गणेश विसर्जनाच्या मिरणवणुकीवेळी शिवसेना आणि शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये मोठा राडा झाला होता. त्यानंतर आता दोन्ही गटातील राजकीय संघर्ष आता शिगेला पोहचला आहे.

Shivsena vs Shinde Group In Dadar
Shivsena vs Shinde Group In Dadar (HT)

Shivsena vs Shinde Group In Dadar : गणेश विसर्जनावेळी मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर आता शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता दोन्ही गटातील संघर्ष शिगेला पोहचला असून शिवसैनिकांनी माहिम आणि दादरमध्ये आमदार सदा सरवणकर यांचे पोस्टर फाडले आहेत. याशिवाय आमदार सरवणकर यांच्या संपर्क कार्यालयांवर दगडफेक झाल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यामुळं आता शिवसेना आणि शिंदे गटात गणेश मिरवणुकीवरून सुरू झालेल्या वादाला हिंसक वळण लागलं आहे.

गणेश विसर्जनावेळी झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी पाच शिवसैनिकांना अटक केली होती. त्यानंतर आज शिवसेनेच्या नेत्यांनी असंख्य शिवसैनिकांना सोबत घेऊन पोलीस ठाणे गाठले. यावेळी शिवसैनिकांनी शिंदे गटाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

काल झालेल्या राड्यात आमदार सदा सरवणकरांनी गोळीबार केला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली होती. त्यानंतर आता त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता शिवसैनिकांनी त्यांचे पोस्टर्स फाडले आहेत. त्यामुळं आता मुंबईतील सध्याचा राजकीय गोंधळ पाहता शिंदे गटाकडूनही शिवसेनेला उत्तर दिलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

IPL_Entry_Point