मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chandrashekhar Bawankule : "बावनकुळे म्हणजे मतिमंद माणूस", ठाकरे गटातील आमदाराची जहरी टीका

Chandrashekhar Bawankule : "बावनकुळे म्हणजे मतिमंद माणूस", ठाकरे गटातील आमदाराची जहरी टीका

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 09, 2023 08:02 PM IST

Chandrashekhar Bawankule Vs Thackeray : बावनकुळे यांच्याकडे पाहिले तर ते एक मतिमंद असलेला माणूस दिसतात. मतिमंद माणसाने अशी भाषा बोलू नये.'', अशा शब्दात आमदार नितीन देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर घणाघात केला आहे.

Chandrashekhar Bawankule Vs thackeray
Chandrashekhar Bawankule Vs thackeray

भाजप व ठाकरे गटामध्ये वाद पेटलेला असताना आता ठाकरे गटातील आमदाराने भाजप प्रदेशाध्यक्षांवर जहरी टीका केली आहे.“बावनकुळे यांची औकात काय आहे? त्यांनी मातोश्रीच्या बाहेर जाऊन उद्धव ठाकरे यांना रोखून दाखवावे. खरे दूध न पिलेला माणूस म्हणजे बावनकुळे आहे. त्यांच्याकडे पाहिले तर ते एक मतिमंद असलेला माणूस दिसतात. मतिमंद माणसाने अशी भाषा बोलू नये.'', अशा शब्दात आमदार नितीन देशमुख यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर घणाघात केला आहे.

शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना घेऊन सुरत गाठले होते. त्यावेळी गुजरातला गेलेल्या आमदारांपैकी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख हे पळून आले होते व आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचं स्पष्ट केले होते. त्यांनी बावनकुळे यांच्यावर जहरी टीका केली आहे.

ठाण्यातील रोशनी शिंदे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका करताना त्यांना लाळघोट्या व फडतूस गृहमंत्री संबोधले होते.

त्यानंतर, भाजप नेते ठाकरे गटावर आणि उद्धव ठाकरेंवर तुटून पडले. त्यावेळी, बावनकुळे म्हणाले होते की, उद्धव ठाकरेंनी मर्यादा सोडली तर आमचे कार्यकर्ते ऐकणार नाहीत. तुम्ही आमच्या नेत्यांना बोलणार असाल तर तुम्हाला घराबाहेर पडू देणार नाही. घरकोंबडा बनून रहावे लागेल. हा तुम्हाला शेवटचा इशारा आहे, असे म्हटले होते. त्यावर, आता आमदार नितीन देशमुख यांनी प्रत्त्युतर दिलं आहे.

IPL_Entry_Point