मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  राजकीय गदारोळ सुरू असतानाच पार पडला आमदार देवेंद्र भुयार यांचा साखरपुडा

राजकीय गदारोळ सुरू असतानाच पार पडला आमदार देवेंद्र भुयार यांचा साखरपुडा

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 30, 2022 01:03 PM IST

राजकीय गदारोळात राज्यसभा, विधान परिषदेवेळी एका मतामुळे चर्चेत आलेले अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा बुधवारी साखरपुडा पार पडला.

देवेंद्र भुयार
देवेंद्र भुयार

Devendra Bhuyar Engagement) राज्यसभा, विधानपरिषद निवडणूक यानंतर थेट सत्ताबदलापर्यंत जून महिन्यात राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. या सगळ्या राजकीय गदारोळात राज्यसभा, विधान परिषदेवेळी एका मतामुळे चर्चेत आलेले अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांचा बुधवारी साखरपुडा पार पडला. विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीत मतदान फुटल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र भुयार यांचे नाव घेतले होते. त्यावेळी अजित दादा सांगतील तीच पूर्व दिशा असं आमदार देवेंद्र भुयार यांनी स्पष्ट सांगितलं होतं.

अमरावती जिल्ह्यातल्या वरुड मोर्शी मतदारसंघाचे अपक्ष आमदार असलले देवेंद्र भुयार हे डॉक्टर असलेल्या मोनाली दिलीप रामे यांच्याशी विवाहबद्ध होणार आहेत. मोर्शी मतदारसंघाचे युवा आमदार असणारे देवेंद्र भुयार आता दर्यापूरचे जावई होणार आहेत. दर्यापूरमधील इंद्रप्रस्थ लॉन याठिकाणी देवेंद्र भुयार आणि मोनाली राणे यांचा साखरपुडा झाला.

देवेंद्र भुयार यांच्या भावी पत्नी मोनाली राणे या डॉक्टर आहेत. तर त्यांचे वडील दिलीप राणे हे जिल्हा परिषदेचे निवृत्त शिक्षक आहेत. दर्यापूरमध्ये भुयार आणि राणे कुटुंबियांसह नातवाईक आणि मोजक्या मित्रमंडळी्ंच्या उपस्थितीत देवेंद्र भुयार यांचा साखरपुडा समारंभ झाला.

२०१९ च्या निवडणुकीत देवेंद्र भुयार यांनी भाजपचे अनिल बोंडे यांना पराभूत केलं होतं. याच अनिल बोंडे यांना भाजपने राज्यसभेवर पाठवलं आले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्यानंतर संजय राऊत हे भडकले होते. तेव्हा त्यांनी संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांचे नाव घेत दगाबाजीचा आरोप केला होता.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या