मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  'बावनकुळे वेस्ट इंडिजच्या ऍम्ब्रोससारखे दिसतात, उद्धव ठाकरे घेणार विकेट', भास्कर जाधवांची टीका

'बावनकुळे वेस्ट इंडिजच्या ऍम्ब्रोससारखे दिसतात, उद्धव ठाकरे घेणार विकेट', भास्कर जाधवांची टीका

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Apr 10, 2023 09:34 PM IST

Bhaskar Jadhav on Chandrashekhar bawankule : चंद्रशेखर बावनकुळे वेस्ट इंडिजच्या खेळाडूसारखे दिसतात,असंवादग्रस्त विधान भास्कर जाधव यांनी केलं आहे.

भास्कर जाधवांची बावनकुळेंवर टीका
भास्कर जाधवांची बावनकुळेंवर टीका

मुंबई – शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेत्यांची भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरील जहरी शेरेबाजी सुरूच आहे. बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी बावनकुळे हे मतिमंद असल्यासारखे दिसतात असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता आमदार भास्कर जाधव यांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे वेस्ट इंडिजच्या खेळाडूसारखे दिसतात, असं विधान भास्कर जाधव यांनी केलं आहे.

भास्कर जाधव म्हणाले की,मी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे जरा बारकाईने बघितलं. बावनकुळे आहेत महाराष्ट्रातले पण दिसतात वेस्ट इंडिजच्या क्रिकेट खेळाडूसारखे. याबाबत मी विचार केला असता कोणी म्हटलं व्हिव्हियन रिचर्ड्स,पण तो शरीराने चांगलाच मजबूत होता. पॅट्रिक पॅटर्सन दिसतो तसा हा दिसतो का? तर नाही. कोर्टनी वॉल्शसारखा दिसतो का नाही? ब्रायन लारा दिसतो का? नाही.  मग माझ्या लक्षात आलं हा एम्ब्रोस सारखा दिसतो. जुन्या लोकांना माहिती असेल एम्ब्रोस कसा दिसतो ते. कदाचित बावनकुळे त्यांना लाजवतील', असं विधान भास्कर जाधव यांनी केले आहे.

त्यानंतर भास्कर जाधव म्हणाले की, तुम्ही वेस्ट इंडिजच्या खेळाडू सारखे फक्त दिसता. ते मैदानात खेळणार होते. तुम्ही कुणाविरुद्ध खेळताय? उद्धव ठाकरेंबरोबर. एका बॉलमध्ये ते तुमची विकेट काढतील, अन् तुम्हाला पत्ताही लागणार नाही', अशी टीका भास्कर जाधव यांनी केली.

दरम्यान भास्कर जाधव यांच्या विधानावर भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी भास्कर जाधव यांच्या वक्तव्याचा निषेध करत म्हटले आहे की,' भास्करशेठ, भारतीयांना रंगावरून हिणवणाऱ्या गोऱ्या कातडीच्या ब्रिटिशांनाही भारतीयांनी घालवले आहे, तुम्ही कोण लागलात?  तुमची ब्रिटीशांची मानसिकता आहे.

 

माणसाचे रंगरुप न पाहता कर्तृत्व पाहावं. बावनकुळे यांनी सामान्य कुटूंबातून येऊन मोठ्या कष्टाने उच्च पदे भूषवली आहेत.

IPL_Entry_Point