मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  VIDEO : बच्चू कडूंनी पाण्यातून खाल्ले पारले बिस्किट, म्हणाले,'अनेकदा आधार दिला'

VIDEO : बच्चू कडूंनी पाण्यातून खाल्ले पारले बिस्किट, म्हणाले,'अनेकदा आधार दिला'

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 20, 2022 12:42 PM IST

राज्य मंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी पारलेजी बिस्किट पाण्यातून खात असलेला व्हिडीओ शेअर करताना याच पाणी आणि पारलेजीने अनेकदा आधार दिल्याचं म्हटलं आहे.

राज्य मंत्री बच्चू कडू
राज्य मंत्री बच्चू कडू (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुकीची (Vidhan Parishad) धामधूम सुरू आहे. गुप्त पद्धतीने मतदान असल्याने मते फुटण्याचा धोका निर्माण होऊ नये म्हणून राज्यात प्रमुख पक्षांकडून आमदारांना फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. आमदारांच्या हॉटेलमधील वास्तव्याची चर्चा होत असताना दुसऱ्या बाजूला अपक्ष आमदार आणि राज्य मंत्री असलेल्या बच्चू कडू (Bacchu Kadu)यांनी मात्र रविवारी पान टपरीवर पाण्यातून पारलेजी बिस्किट खाण्याचा अस्वाद घेतला. नेहमीच आपल्या आंदोलनाच्या वेगळ्या स्टाइलने चर्चेत असलेले बच्चू कडू यांचा कालचा पान टपरीवरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

राज्य मंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी पारलेजी बिस्किट पाण्यातून खात असलेला व्हिडीओ शेअर करताना याच पाणी आणि पारलेजीने अनेकदा आधार दिल्याचं म्हटलं आहे. ट्विटरवर व्हिडीओ शेअर करताना बच्चू कडू यांनी म्हटलं की, "पारलेजी अनेकांना आधार देणारे बिस्किट. पाणी व पारलेजी याची जोड काही वेगळीच आहे. अनेकदा रात्री-अपरात्री पारलेजीने आम्हाला आधार दिला. आज मुंबईत कामानिमित्त टपरीवर तोच अनुभव परत आला."

अकोला जिल्ह्यातील अचलपूर मतदारसंघाचे आमदार असलेल्या बच्चू कडू याची ओळख दिव्यांग, शेतकरी, मजूर यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा नेता अशी आहे. अनेकदा त्यांनी आपल्या आक्रमक शैलीचा हिसका प्रशासकीय अधिकाऱ्यांना दाखवला आहे. दिव्यांगांसह शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे बच्चू कडू हे महाविकास आघाडी सरकारमधील आक्रमक मंत्री म्हणूनहू ओळखले जातात.

विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर अपक्ष आमदारांची मते आपल्या बाजुने वळवण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून जोरदार प्रयत्न केले गेले. यातच भाजपने अपक्ष आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला. यावर प्रतिक्रिया देताना बच्चू कडूंनी खोचक टोला लगावत म्हटलं की, "आम्ही पण संपर्कात आहोत की देवेंद्र फडणवीस आम्हाला कसं मत देतील. मला पूर्ण विश्वास आहे की देवेंद्रजी आम्हाला मत देतील."

WhatsApp channel

संबंधित बातम्या