कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील यमगरनी गावात एक आश्चर्यचकीत करणारा प्रकार समोर आला आहे. स्थानिक लोकांनी काळ्या कुत्र्याला फुलांचे हार घालून गावातून मिरवणूक काढली. त्याच्या सन्मानार्थ गाव जेवण घातले गेले. पंढरपुरच्या यात्रेत हरवलेले कुत्रे गावात सुखरुप परतणे गावकऱ्यांसाठी चमत्काराहून कमी नव्हते. या कुत्र्याला सर्वजण प्रेमाने'महाराज' नावाने बोलावले जाते. हे कुत्रे पंढरपूरच्या आषाढी वारीत रस्ता चुकून भटकले होते.
मालकापासून ताटातूट झाल्यानंतर या कुत्र्याने एकटेच जवळपास२५०किलोमीटरचा प्रवास करून उत्तर कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील आपले गाव गाठले. जूनच्या शेवटच्या आठवड्यात 'महाराज' चे मालक कमलेश कुंभार पंढरपूर वारीसाठी निघाले होते. त्यांच्याबरोबर त्यांचा कुत्राही होता. कुंभार यांनी सांगितले की, दरवर्षी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला ते पंढरपूरला जातात. यावेळी त्यांनी आपल्या कुत्र्यालाही सोबत घेतले होते.
कुंभार यांनी सांगितले की,''महाराज' ला भजन ऐकण्याचा नाद आहे. गावात कुठेही भजनाचा कार्यक्रम असला की, ते कुत्र्याला घेउन जातात. एकदा ते कोल्हापूरमधील ज्योतिबाच्या पदयात्रेलाही गेले होते. जवळपास २५०किलोमीटरपर्यंत हा कुत्रा आपला मालक व त्यांच्या मित्रांसोबत गेला. कुंभार यांनी म्हटले की, विठ्ठल मंदिराच्या दर्शनानंतर कुत्रा बेपत्ता झाला. त्याला सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कुठेच दिसला नाही.
तेथील लोकांनी सांगितले की, कुत्रा दुसऱ्या समुहासोबत गेला आहे. कुंभार यांनी सांगितले की, त्याला पंढरपुरात सगळीकडे शोधले मात्र तो दिसला नाही. त्यानंतर त्यांनी विचार केला की, लोकांनी सांगितल्याप्रमाणे कुत्रा दुसऱ्या समुहासोबत गेला असावा. त्यानंतर १४ जुलै रोजी ते आपल्या घरी परतले.
कुंभार यांनी आश्चर्य व्यक्त करत म्हटले की, दुसऱ्यात दिवशी'महाराज 'घराच्या अंगणात शेपटी हलवत उभा होता, जसे काही घडलेच नाही. त्याची प्रकृती ठीक होती. त्यांनी सांगितले की, घरापासून २५० किलोमीटर अंतरावर हरवलेले कुत्रे घरी परतणे एक चमत्कारच आहे. आमचे मानणे आहे की, पांडुरंगानेच त्याचे मार्गदर्शन केले असावे.
संबंधित बातम्या