मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mira Road incident: मीरा रोड घटनेचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक

Mira Road incident: मीरा रोड घटनेचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 23, 2024 03:33 PM IST

Mira Road Viral Video: मीरा रोड घटनेचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी एकाला मीरा रोड पोलिसांनी अटक केली.

Mira Road car attacked
Mira Road car attacked

Mira Road Riot: अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठानिमित्त २१ जानेवारी रोजी हिंदू समुदायाने काढलेल्या रॅलीमुळे मुस्लिम आणि हिंदू समुदायांमध्ये बाचाबाची झाली. भगवे झेंडे फडकावत आणि ‘जय श्री राम’चा नारा देणाऱ्या हिंदू समाजावर मुस्लिम समुदायाच्या लोकांनी कथित हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा मीरा भाईंदर पोलिसांनी इशारा दिला.

अबू शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सोशल मीडियाद्वारे तो लोकांना भडकावताना दिसत. त्याला पोलिस कोठडीत घेण्यात आले आहे. आतापर्यंत १३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून इतर संशयितांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काहीजण रामध्वज असलेल्या वाहनाच्या काचा फोडत आहेत. तसेच शाब्दिक शिवीगाळ, कारच्या बंपरवरील भगवान हनुमानाचे स्टिकर ओरबाडणे काढत असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Mumbai Police: मुंबईतील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या २८ जानेवारीपर्यंत सुट्ट्या रद्द!

मीरा भाईंदरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक यांनी परिसरात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. “आम्ही या घटनेचा तपास करत आहोत. आरोपींवरच कारवाई केली जाईल. मी सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करतो. पोलिसांनी वेळीच कारवाई केली. आम्ही सीसीटीव्ही फुटेज पाहून संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहोत."

मीरा रोड परिसरात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. स्थानिक पोलीस, मुंबई पोलीस, पालघर पोलीस, ठाणे ग्रामीण पोलीस, आरएएफ (रॅपिड अॅक्शन फोर्स), एमएसएफ (महाराष्ट्र सुरक्षा दल) आणि एसआरपीएफचे जवान या परिसरात तैनात करण्यात आले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मीरा-भाईंदरमधील नयानगर भागात काल रात्री घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती काल रात्रीच घेतली आहे. सोमवारी पहाटे ३.३० वाजेपर्यंत मी मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांच्या सातत्याने संपर्कात होतो. आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत १३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. सीसीटीव्ही फुटेज तपासून अन्य आरोपी ओळखण्याची प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था कुणी बिघडविण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही.

WhatsApp channel