Mira Road Cylinder Blast: मुंबईच्या मीरा रोड येथील अपार्टमेंटमध्ये सिलिंडरचा स्फोट
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mira Road Cylinder Blast: मुंबईच्या मीरा रोड येथील अपार्टमेंटमध्ये सिलिंडरचा स्फोट

Mira Road Cylinder Blast: मुंबईच्या मीरा रोड येथील अपार्टमेंटमध्ये सिलिंडरचा स्फोट

Feb 02, 2024 09:44 AM IST

Mira Road Apartment Cylinder Blast: मीरा रोड येथील रामदेव पार्क परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला.

Mumbai LPG Cylinder Blast
Mumbai LPG Cylinder Blast

Mumbai Mira Road Cylinder Blast: मुंबईच्या (Mumbai) मीरा रोड (Mira Road) येथील रामदेव पार्क (Ramdev Park) परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, या घटनेत एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमीवर जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना गुरुवारी (०१ फेब्रुवारी २०२४) रात्री उशीरा घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

धावत्या बसमधील पायाखालचा पत्रा सरकला अन् विद्यार्थिनी इंजिनमध्ये अडकली, कोल्हापुरातील प्रकार

मिळालेल्या माहितीनुसार, संजय कुमार (वय, १८) जखमीचे नाव आहे. राम कृपा अपार्टमेंटमध्ये सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सुमारे २५ गाड्या आणि चार अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी वेळीच आग आटोक्यात आणली. स्फोटाचा इतका प्रभाव होता की, आजूबाजूच्या भागात राहणाऱ्या लोकांना सौम्य धक्के जाणवले. ज्या ठिकाणी स्फोट झाला, तिथे अधिकाऱ्यांना आणखी पाच १६ किलोग्रॅमचे पाच व्यावसायिक सिलिंडर सापडले. यावरून असे दिसून येत आहे की, या अपार्टमेंटचा वापर स्टोरेजसाठी आणि कॅटरिंग फर्मच्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी केला जात होता.

मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे म्हणाले की, "आम्ही व्यावसायिक सिलिंडर जप्त केले आहेत. तसेच कोणत्या कारणामुळे स्फोट घडला? याचा तपास करत आहोत. मीरा रोड येथे अन्य ठिकाणी राहणाऱ्या अपार्टमेंटच्या मालकाला निवासी ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या साठवणुकीबाबत चौकशीसाठी बोलावले जाईल.या घटनेत संजय कुमार गंभीर जखमी झाला आहे. तर, त्याचा सहकारी थोडक्यात बचावला आहे."

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर