जळगावात भयंकर घडलं! लहान बहिणीसमोरच अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नंतर डोक्यात दगड घालून केली हत्या-minor school girl returning from farm sexually assaulted found dead incident happens in chopda taluka of jalgaon ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  जळगावात भयंकर घडलं! लहान बहिणीसमोरच अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नंतर डोक्यात दगड घालून केली हत्या

जळगावात भयंकर घडलं! लहान बहिणीसमोरच अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नंतर डोक्यात दगड घालून केली हत्या

Sep 08, 2024 02:34 PM IST

Jalgaon Crime News : जळगावात शेतात लहान बहिणीसोबत गेलेल्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

लहान बहिणीसमोरच अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नंतर डोक्यात दगड घालून केली हत्या
लहान बहिणीसमोरच अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नंतर डोक्यात दगड घालून केली हत्या

Jalgaon Crime News : देशात महिलांवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाही. राज्यात बदलापूर येथील एका शाळेत दोन मुलींवर अत्याचार झाल्या प्रकरणी जनक्षोभ उसळला होता. ही घटना ताजी असतांना आता जळगावमध्ये मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जळगावात संतापाची लाट उसळली आहे. एक १२ वर्षांची अल्पवयीन मुलगी ही शेतातून आपल्या लहान बहिणीसोबत घरी जात होती. यावेळी आरोपींनी या मुलीला शेतात जबरदस्तीने ओढून नेत तिच्यावर बलात्कार केला. यानंतर मुलीच्या लहान बहिणीसमोरच तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.

ही घटना चोपडा तालुक्यात शनिवारी घडली. आरोपीने आधी तिच्यावर बलात्कार केला व त्यानंतर डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. स्थानिक ग्रामस्थांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. पोलिसांनीही आरोपीला अटक केली आहे.

काय आहे घटना?

मिळालेल्या माहितीनुसार खून झालेली अल्पवयीन मुलगी ही शनिवारी शेतात कामासाठी गेली होती. यावेळी तिच्या सोबत तिची लहान बहीण देखील होती. ही मुलगी संध्याकाळी शेतातून काम संपवून घर जात होती. यावेळी आरोपीने तिचा हात जबरदस्तीने ओढून जवळच्या शेतात नेले. या ठिकाणी त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच या घटनेची माहिती तिने कुणाला देऊ नये या साठी त्याने जवळच असलेल्या दगडाने मुलीचे डोके ठेचून तिची निर्घृण हत्या केली. यावेळी पीडित मुलीची लहान बहीण समोर होती. तिच्या समोरच नराधमाने हे कृत्य केले. यानंतर लहान बहिणीने गावात जाऊन ही घटना ग्रामस्थांना सांगितली. यावेळी सर्वांना धक्का बसला. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. तर आरोपी हा फरार होण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अंबरनाथमध्ये मुलीचा विनयभंग

अंबरनाथमध्ये एका ६ वर्षीय मुळीच एका तरुणाने विनयभंग केला. ही घटना नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला चांगलाच चोप दिला. ही घटना अंबरनाथचया पूर्व भागातील शिवाजीनगर येथे घडली. पीडित मुलगी व आरोपी हे दोघे एकाच ठिकाणी राहण्यास आहे. ही मुलगी शनिवारी घरी जात असतांना आरोपीने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी मुलीची त्याच्या तावडीतून सुटका करत त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

Whats_app_banner