Latur News: आईशी वाद घातला म्हणून एका १६ वर्षाच्या पुतण्याने चुलत्याची चाकू भोसकून हत्या केली.लातूरमधील आरव्ही परिसरात बुधवारी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
मिळालेल्या महितीनुसार, हत्या झालेला व्यक्ती त्याचे आधार कार्ड आणि बँकेची कागदपत्रे घेण्यासाठी आपल्या वहिणीच्या घरी गेला होता. परंतु, त्याच्या वहिणीने त्याचे कोणतेही कागदपत्रे आपल्याजवळ नसल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांत वाद झाला. त्यानंतर आरोपी मुलाने आपल्या आईशी वाद घालणाऱ्या चुलत्याची चाकू भोसकला. या घटनेत चुलता गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
मृत व्यक्तीच्या पत्नीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मुलगा आणि त्याच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशी केली असता आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील चौकशीला सुरूवात केली.
धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात गुरुवारी एका दाम्पत्याचे आणि त्यांच्या दोन मुलांचे मृतदेह घरात आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली. पतीचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तर, त्याची पत्नी आणि दोन मुलांचा विष पिऊन मृत्यु झाल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट झाले. ही घटना प्रमोद नगर भागातील समर्थ कॉलनीत घडली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. प्रवीण सिंग गिरासे (वय, ५३), त्यांची पत्नी दीपांजली (वय, ४७) आणि त्यांची मुले मितेश (वय, १८) आणि सोहम (वय, १५) अशी मृतांची नावे आहेत. गिरासे यांच्या घरातून दुर्गंधी असल्याची शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गिरासे यांच्या घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता घरातील सर्वांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. मृतांजवळ कोणतीही सुसाईड नोट न सापडल्याने पोलीस आत्महत्येचे कारण शोधत आहेत.
पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार,धुळे येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनात पत्नी आणि दोन मुलांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याचे स्पष्ट झाले. गिरासे यांचे लामकानी गावात कीटकनाशक विक्रीचे दुकान असून त्यांची पत्नी शिक्षिका व मुले शिकत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी देवपूर पश्चिम पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.