अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं; नवी मुंबईतील धक्कादायक घटना
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं; नवी मुंबईतील धक्कादायक घटना

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं; नवी मुंबईतील धक्कादायक घटना

Nov 25, 2024 07:30 PM IST

Minor girl rape In Navi Mumbai: नवी मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं
अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नंतर वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं

Navi Mumbai Rape News: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशा घटनेतील दोषींविरोधात कडक कारवाई केली जात असताना नवी मुंबई येथून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली. स्पामध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर पीडितेला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १४ वर्षाची आहे. आरोपींपैकी एका महिलेने पीडित मुलीला स्पामध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका स्पामध्ये नेले, जिथे स्पा मालक आणि आणखी एका व्यक्तीने पीडितावर बलात्कार केला. हा प्रकार २१ ते ३१ ऑगस्ट २०२४ दरम्यान घडला. याप्रकरणी पीडिताने दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांवर बीएनएस आणि पॉक्सो कायद्यांतर्गत बलात्कार, धमकावणे आणि इतर गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती नेरुळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशा मागणीने जोर धरला आहे.

मुंबईत विनयभंगांची सर्वाधिक गुन्हे

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २०२३-२०२४ या कालावधीत मुंबईत विनयभंगांची सर्वाधिक गुन्हे नोंदवण्यात आले. मुंबईनंतर पुणे, नागपुरात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली, यात बलात्कार, अपहरण, हुंडाबळी, विनायभंग यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

राज्यात गेल्या पाच वर्षात बलात्काराच्या सर्वाधिक घटना

राज्यात गेल्या पाच वर्षात सर्वाधिक बलात्काराच्या घटना २०२३ मध्ये घडल्या आहेत. दरम्यान, २०१७ मध्ये राज्यात एकूण ४ हजार ३२० बलात्काराच्या घटना घडल्या. तर, २०१८ मध्ये ४ हजार ९७४ बलात्काराच्या घटना नोंदवण्यात आल्या. तर, २०१९- ५ हजार ४१२ घटना, २०२० मध्ये ४ हजार ८४६ घटना, २०२१- ५ हजार ९५४ घटना, २०२२ मध्ये ७ हजार ८४ आणि २०२३ मध्ये ७ हजार ५२१ घटना घडल्या आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या संख्येत वाढ होत असून राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर