Mumbai Gangrape News: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे. बलात्कार प्रकरणातील आरोपींविरोधात कठोर पावले उचलली जात असतानाही अशा घटना थांबायच्या नाव घेईना. मुंबईतील कांदिवली परिसरात एका १७ वर्षीय सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. तर, या घटनेतील एक आरोपी अल्पवयीन असल्याने त्याच्या रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपीने त्याचे कुंटुंब बाहेर असताना पीडिताला आपल्या घरी बोलावून घेतले. अल्पवयीन आरोपीचे मित्र तेजस महाडिक (लय, २१) आणि ओंकार पाटील (वय, २०) तिथे उपस्थित होते. या तिघांनी तिच्यावर बलात्कार केला आणि तिला ब्लॅकमेल करण्यासाठी आक्षेपार्ह व्हिडिओ देखील शूट केले. हा धक्कादायक प्रकार ६ जानेवारी २०२५ रोजी घडला. मात्र, गुरुवारी संध्याकाळी पीडिताने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या पालकांना सांगितला. यानंतर पीडिताच्या पालकांनी समतानगर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात तक्रार नोंदवली.
समतानगर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, तेजस महाडिक आणि ओंकार पाटील यांना भारतीय न्याय संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याअंतर्गत सामूहिक बलात्कार, हल्ला आणि इतर गुन्ह्यांसाठी अटक करण्यात आली. तर, अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले.
संबंधित बातम्या