माथेरानमध्ये फिरायला गेलेल्या मुलीवर बलात्कार; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतापजनक प्रकार उघडकीस
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  माथेरानमध्ये फिरायला गेलेल्या मुलीवर बलात्कार; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतापजनक प्रकार उघडकीस

माथेरानमध्ये फिरायला गेलेल्या मुलीवर बलात्कार; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतापजनक प्रकार उघडकीस

Updated Jul 21, 2024 05:51 PM IST

Mumbai Minor girl Rape: माथेरानमध्ये मित्रांसोबत फिरायला गेलेल्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून इतर दोघांचा शोध सुरू आहे.

मुंबईतील अल्पवयीन मुलीवर माथेरानध्ये बलात्कार
मुंबईतील अल्पवयीन मुलीवर माथेरानध्ये बलात्कार (HT_PRINT)

Matheran Rape: मित्रांसोबत माथेरानला फिरायला गेलेल्या मुंबईतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय तरुणाला अटक केली असून इतर दोन जणांचा शोध सुरू आहे. ही घटना १२ जुलै २०२४ रोजी घडली. मात्र, पीडित मुलीने या घटनेबाबत पालकांना सांगितले नाही. परंतु, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीला तिची अल्पवयीन मैत्रीण आणि तिचा २२ वर्षीय मित्र माथेरानला घेऊन गेले होते, त्यांच्यासोबत घाटकोपर येथील एक व्यक्तीही होता, ज्याने पीडितावर बलात्कार केला. त्यावेळी २२ वर्षीय तरुणाने या कृत्याचा व्हिडिओ बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर अपलोड केला. पीडितेच्या एका नातेवाईकाने सोशल मीडियावर हा प्रकार पाहिला आणि तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर पीडिताच्या पालकांनी तिची चौकशी केली. त्यानंतर अल्पवयीन मुलीने संपूर्ण प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

अँटॉप हिल पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी त्यांनी २२ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (बलात्कार), ६५ (१) (१६ वर्षांखालील महिलेवर बलात्कार), १३७ (२) (अपहरण), ३ (५) (समान हेतू), ३ (६) (अनेकांनी केलेला गुन्हा) आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या कलम ४ (लैंगिक अत्याचार), ६ (लैंगिक अत्याचार), ८ (लैंगिक अत्याचार) आणि १२ (लैंगिक छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अ (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील मजकूर प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे) आणि ६७ बी (लैंगिक कृत्यात मुलांचे चित्रण करणारे साहित्य प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे) लागू केले आहे, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

नवी मुंबईतील हॉटेलमध्ये मेकअप आर्टिस्टवर बलात्कार

नवी मुंबई शहरात एका महिला मेकअप आर्टिस्टवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून नवी मुंबई पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. ३१ वर्षीय पीडितेने एपीएमसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दोन वर्षांपूर्वी एका हॉटेलमध्ये दोन नराधमांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर