उपमुख्यमंत्र्यांचा पीए झाला आमदार; वाचा देवेंद्र फडणवीस यांचे पीए सुमीत वानखडे यांचा प्रवास
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  उपमुख्यमंत्र्यांचा पीए झाला आमदार; वाचा देवेंद्र फडणवीस यांचे पीए सुमीत वानखडे यांचा प्रवास

उपमुख्यमंत्र्यांचा पीए झाला आमदार; वाचा देवेंद्र फडणवीस यांचे पीए सुमीत वानखडे यांचा प्रवास

Nov 27, 2024 11:25 AM IST

Who is Sumit Wankhede : देवेंद्र फडवणीस यांचे पीए सुमित वानखडे यांनी आर्वी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक वर्धा जिल्ह्यातून सर्वाधिक मते मिळवत निवडून आले आहेत. त्यांनी खासदार अमर काले यांच्या पत्नी मयूरा काळे यांचा पराभव केला.

मंत्र्याचा पीए झाला आमदार; वाचा देवेंद्र फडणवीस यांचे पीए सुमीत वानखडे यांचा प्रवास
मंत्र्याचा पीए झाला आमदार; वाचा देवेंद्र फडणवीस यांचे पीए सुमीत वानखडे यांचा प्रवास

Who is Sumit Wankhede : विधानसभा निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवांचा दारुण पराभव केला. या निवडणुकीत एकट्या भाजपने तब्बल १३२ जागांवर विजय मिळवत सर्वाधिक जागा मिळवल्या. उमेदवारी देतांना अनेक नव्या चेहऱ्यांना भाजपने संधी दिली. यात म्हटवाच नाव म्हणजे सुमित वानखडे. सुमित वानखडे हे देवेंद्र फडणवीस यांचे पीए होते. त्यांना वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली होती. ते वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक मते मिळवून निवडणूक आलेले उमेदवार आहेत. सुमित वानखडे यांचा जीवणप्रवास थक्क करणारा आहे.

खासदार अमर काळे व आमदार सुमित वानखेडे हे आर्वी पालिकेच्या ऐतिहासिक गांधी विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. बरीच वर्षे आर्वीबाहेर राहूनही वानखेडे यांना उमेदवारी देणात आली. यात देवेंद्र फडणवीस यांचा पाठीशी असलेला भक्कम हात कारणीभूत ठरला. विद्यमान आमदार दादाराव केचे यांना उमेदवारी नाकारत सुमित वानखडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांना दिलेल्या संधीचे वानखडे यांनी सोने केले.

सुमीत वानखेडे यांच्यासाठी विधानभवन तसे पाहिले तर नवे नाही. कारण ते गेली अनेक वर्ष विधानभवनात फिरत आहेत. या पूर्वी आमदार मंत्र्यांचे पीए म्हणून ते विधानसभेत गेले आहे. मात्र, आता ते थेट आमदार म्हणूंन विधानसभेत प्रवेश करणार आहेत.

कोण आहेत सुमीत वानखेडे?

वानखेडे हे मूळचे वर्धा जिल्ह्याच्या आर्वी मतदारसंघातील आहेत. २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत इच्छुकांच्या यादीत त्यांचे नाव झळकले होते. वानखेडे यांच्याकडे वर्धा लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी पद देखील सोपवले होते. नेत्यांचे स्वीय सचिव निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची ही पहिली वेळ नाही. या आधी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सचिव राहिलेले अभिमन्यू पवार हे निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. यंदाच्या सलग दुसऱ्यांदा ते लातूरमधील औसा या मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. तसेच उद्धव ठाकरेंचे सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील आमदार आहेत.

सुमित वानखडे हे पुण्यातील एका खासगी महाविद्यालयातून गव्हर्नन्सची पदव्युत्तर पदवी घेतली. वानखेडे हे फडणवीस यांचे गेल्या काही वर्षांपासून स्वीय सहायक राहिले आहेत. प्रशासकीय कामाव्यतिरिक्त त्यांनी शेतीकडेही लक्ष दिले आहे. आर्वीतील ते एक प्रगतिशील शेतकरी मानले जातात. विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (एसपी) मयुरा अमर काळे यांचा सुमारे ३९ हजार मतांनी पराभव केला. आमच्यासारख्या प्रशासकीय लोकांसाठी आणि नोकरशाहीत काम करणाऱ्यांना हा दुहेरी फायदा आहे. आम्हाला आधीच प्रशासनात काम करण्याचा अनुभव असल्याने, याच अनुभव आमदार म्हणूंन दैनंदिन काम हाताळण्यास फायदेशीर ठरेल असे सुमित काळे म्हणतात. 

फडणवीस यांचे आणखी एक पीए अभिमन्यू पवार हे २०१९ च्या निवडणुकीत प्रथम क्रमांकाचे उमेदवार होते. त्यांनी औसा जागेवर काँग्रेसचे बसवराज पाटील यांचा २६,००० मतांनी पराभव केला. २०१४ च्या निवडणुकीत पवार हे शिवसेनेचे दिनकर माने यांच्या विरोधात भाजपकडून निवडणूक रिंगणात उभे होते. या मतदारसंघातून सुमारे ३३००० हजार मतांनी त्यांनी विजय मिळवला आहे.

या सोबतच पुण्यातील आंबेगाव मतदार संघातील विजयी उमेदवार दिलीप वळसे पाटील हे देखील शरद पवार यांचे पीए राहिले आहे त्यावेळी शरद पवार हे काँग्रेसमध्ये होते.

Whats_app_banner