मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  उद्धवजींसाठी सातव्या मजल्यावरून उडी मारेन म्हणणारे शिंदेंच्या गटात, म्हणाले…

उद्धवजींसाठी सातव्या मजल्यावरून उडी मारेन म्हणणारे शिंदेंच्या गटात, म्हणाले…

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 22, 2022 11:30 AM IST

एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्यासाठी सातव्या मजल्यावरून उडी मारेन म्हणणारे मंत्री संदीपान भुमरे हेसुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीत आहेत.

मंत्री संदीपान भुमरे
मंत्री संदीपान भुमरे

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह अनेक आमदार विधान परिषद निवडणुकीनंतर सुरतला गेले होते. आता तिथून सर्वजण आसाममध्ये गुवाहाटीत गेले आहेत. दरम्यान, नॉट रिचेबल असलेले मंत्री आणि आमदारांशी आता संपर्क होत आहे. यातीलच मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी आता एकनाथ शिंदे सांगतील तेच कऱणार असल्याचं म्हटलं आहे. एकनाथ शिंदे आमचं नेतृत्व करतील असं भुमरे म्हणाले आहेत.

संदीपान भुमरे यांनी म्हटलं की, "आम्ही ३५ ते ३६ जण सोबत आहे. सगळे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलो आहे. ते सांगितल तसंच करणार आहे. उद्धव साहेब आणि शिंदेसाहेबांचं काय बोलणं झालं ते आम्हाला माहिती नाही. मात्र शिंदे सांगतील तसंच, जो आदेश देतील ते करू." शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासह सोबत असलेल्यांना संपर्क साधण्यात आला. त्याबाबत बोलताना भुमरे म्हणाले की," मला फोन केलेला होता, पण मी सांगितलं शिंदेसाहेबांसोबत आहे असं सांगितलं. मला खैरे साहेबांनी फोन केला होता. आम्ही स्पष्ट सांगितलं जिल्ह्यातील ६ पैकी ५ जण त्यांच्यासोबत आहोत. आमचं म्हणणं आहे की मतदारसंघातील कामं व्हावी, निधी मिळावी यासाठी सर्वांची नाराजी आहे."

आपल्याला शिवसेनेनं आणि उद्धव ठाकरे यांनी सगळं काही दिलंय तरी नाराजी कसली असं विचारले असता भुमरे म्हणाले की, "मी त्यांच्याकडे वैयक्तिक काहीही मागितलेलं नाही. कामं व्हायला हवीत हाच एक हेतू होता. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत कामं करताना अडचणी येतात. त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य केलंय. तो माणून सर्व कामं करतो."

"आपण उद्धव ठाकरेंसाठी सातव्या मजल्यावरून उडी मारू असं म्हटलं होतो. पण सत्ता आली तरी काम होतं नव्हती. मी याबाबत उद्धव साहेबांना सतत सांगत होतो. मला मंत्रिपद आहे त्यापेक्षा आणखी काय हवंय.", असंही भुमरे म्हणाले. “मी एकनाथ शिंदेसोबत पदासाठी गेलो नाही. सत्ता असतानाही एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदार आलेत म्हणजे काहीतर कारण असेल. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत काम करताना त्रास होतो याची माहिती उद्धव ठाकरेंना दिल्याचंही”, भुमरे यांनी सांगितले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या