मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांचे पाय कापणाऱ्याला दोन लाखांचे बक्षीस देऊ; एमआयएम नेत्याचे विधान

Sambhaji Bhide : संभाजी भिडे यांचे पाय कापणाऱ्याला दोन लाखांचे बक्षीस देऊ; एमआयएम नेत्याचे विधान

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Aug 01, 2023 11:40 PM IST

Sambhaji bhide : संभाजी भिडे यांच्या मिशाच नव्हे तर त्यांचे पाय कापणाऱ्याला दोन लाख रूपयांचे बक्षीस देऊ, असे जहाल विधान एमआयएमच्यासोलापुरातील पदाधिकाऱ्याने केले आहे.

Sambhaji bhide
Sambhaji bhide

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान करणारे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडे यांच्या विरोधात राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस व अन्य संघटनांकडून भिडे यांचा निषेध व्यक्त करत त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलने होत आहेत. नुकतेच समता परिषदेच्या पदाधिकाऱ्याकडून संभाजी भिडे यांची मिशी कापणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. आता संभाजी भिडे यांच्या मिशाच नव्हे तर त्यांचे पाय कापणाऱ्याला दोन लाख रुपयांचे बक्षीस देऊ, असे जहाल विधान एमआयएमच्या सोलापुरातील पदाधिकाऱ्याने केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एमआयएम पदाधिकाऱ्याने म्हटले की, भिडे यांचे पोलीस संरक्षण काढून त्यांना पाच मिनिटे आमच्या ताब्यात द्या, असेही वक्तव्य या पदाधिकाऱ्याने केले आहे. सोलापूर शहर जिल्हा एमआयएमच्या वतीने संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलन केले गेले. भिडे यांच्या गांधी विरोधातील वक्तव्याच्या राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना त्यात एमआयएम पक्षाचीही भरपडली आहे. सोलापुरात रेल्वे स्थानकासमोरील गांधीजींच्या पुतळ्याला एमआयएमच्या वतीने दुग्धाभिषेक घालून अभिवादन करण्यात आले. नंतर संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. यामध्ये पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

एआयएमआयएमचे युवक शहराध्यक्ष मोहसीन मैंदर्गीकरम्हणाले की, भिडे हे सातत्याने महापुरूषांच्या विरोधात अवमानकारक विधाने करतात. भारतीय तिरंगा ध्वजाचाही अपमान करतात. त्यांचे हे देशद्रोही कृत्य आहे. परंतु केवळ भाजप सरकार कारवाईविना मोकळे सोडल्यामुळे भिडे यांचे प्रस्थ वाढले आहे. त्यांची मिशी कापून आणण्यासाठीच नव्हे त्यांचे पायदेखील कापणाऱ्यालादोन लाख रूपयांचे बक्षीस देऊ.

WhatsApp channel