worli hit and run : आठ तास नशा उतरणार नाही इतकी दारू मिहिर शहा व त्याचे मित्र प्यायले होते; तपासातून धक्कादायक माहिती
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  worli hit and run : आठ तास नशा उतरणार नाही इतकी दारू मिहिर शहा व त्याचे मित्र प्यायले होते; तपासातून धक्कादायक माहिती

worli hit and run : आठ तास नशा उतरणार नाही इतकी दारू मिहिर शहा व त्याचे मित्र प्यायले होते; तपासातून धक्कादायक माहिती

Jul 11, 2024 02:49 PM IST

Mumbai BMW hit and run case : वरळी इथं घडलेल्या अपघाताच्या आधी मिहिर शहा व त्याच्या मित्रांनी व्हिस्कीचे एकूण १४ पेग घेतले होते, अशी माहिती समोर आली आहे.

मिहिर शहा आणि त्याच्या मित्राने व्हिस्कीचे १२ लार्ज पेग घेतले होते; तपासातून धक्कादायक माहिती समोर
मिहिर शहा आणि त्याच्या मित्राने व्हिस्कीचे १२ लार्ज पेग घेतले होते; तपासातून धक्कादायक माहिती समोर

worli Hit and run : मुंबईतील वरळी येथील हिट अँड रन प्रकरणात अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी मिहीर शाह आणि त्याच्या दोन मित्रांनी कार अपघाताच्या दिवशी व्हिस्कीचे एकूण १२ मोठे पेग (प्रत्येकी ४ पेग) घेतले होते. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बारकडून मिळालेल्या बिलाच्या हवाल्यानं दिली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात घेतलेल्या अल्कोहोलच्या नशेचा अंंमल आठ तासांपर्यंत राहू शकतो, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

वरळी इथं रविवारी पहाटे मिहिर शहा याच्या बीएमडब्ल्यू कारनं एका दुचाकीला पाठीमागून धडक दिली होती. त्या धडकेत मागे बसलेल्या कावेरी नाखवा (४५) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचा पती प्रदीप जखमी झाला. पतीच्या म्हणण्यानुसार, अपघातानंतर कावेरी नाखवा यांना मिहिरच्या कारनं सुमारे दीड किमी पर्यंत फरपटत नेलं. पुढील संकटाची जाणीव होताच मिहिरनं ड्रायव्हरसोबत सीट बदलली आणि दुसऱ्या वाहनानं पळून गेला. अपघातानंतर फरार असलेल्या मिहीर शहाला मंगळवारी अटक करण्यात आली. न्यायालयानं बुधवारी त्याला १६ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

अपघाताच्या रात्री मिहिर शहा आणि त्याचे मित्र रविवारी मध्यरात्री दीड वाजता बारमधून बाहेर पडले. मद्यपान केल्यानंतर चार तासांच्या आत पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

वयाचीही लपवाछपवी

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, मिहिर शाहनं पबमध्ये आपलं वय २७ असल्याचं सांगितलं. तसं आयकार्डही दाखवलं. अधिकृत नोंदीनुसार मिहिर शाह २३ वर्षांचा आहे, तर मद्यपान करण्याचं किमान कायदेशीर वय २५ आहे. मिहिर शाहनं जे ओळखपत्र दाखवलं, त्यात त्याचं वय २७ वर्षे असं नमूद करण्यात आलं होतं, असं पबच्या व्यवस्थापनाचं म्हणणं आहे. त्याच्यासोबत पबमध्ये गेलेले त्याचे तीन मित्र ३० वर्षांहून अधिक वयाचे आहेत.

बारचा परवाना रद्द

२५ वर्षांखालील मिहिरला दारू पाजणाऱ्या जुहू बारचा परवाना राज्य उत्पादन शुल्क प्रशासनानं निलंबित केला आहे. उत्पादन शुल्क विभागाला डॉन जिओव्हानी रेस्टॉरंट, जोबेल हॉस्पिटॅलिटीज प्रायव्हेट लिमिटेड या बारमध्ये देखील काही अनियमितता आढळून आल्या आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर