मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vedanta Foxconn : वेदांता-फॉक्सकॉनबाबत RTI मधून नवीन माहिती समोर

Vedanta Foxconn : वेदांता-फॉक्सकॉनबाबत RTI मधून नवीन माहिती समोर

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 02, 2022 05:52 PM IST

वेदांता कंपनीच्या गुंतवणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारने वेळीच पाऊल न उचलल्याने याचा फटका बसला असल्याची माहिती एमआयडीसीने (MIDC) माहिती अधिकारातंर्गत दिली आहे.

वेदांता-फॉक्सकॉनबाबत  RTI मधून नवीन माहिती समोर
वेदांता-फॉक्सकॉनबाबत  RTI मधून नवीन माहिती समोर

RTI about Vedanta Foxconn : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे राजकीय रणकंदन माजले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे-फडवणीस सरकारमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झडल्या आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्यामुळे वाद सुरु असताना दुसरीकडे माहितीच्या अधिकारात (RTI) नवी माहिती समोर आली आहे. वेदांता कंपनीच्या गुंतवणुकीसाठी महाविकास आघाडी सरकारने  वेळीच पाऊल न उचलल्याने याचा फटका बसला असल्याची माहिती एमआयडीसीने (MIDC) माहिती अधिकारातंर्गत दिली आहे. 

माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या माहितीत सांगण्यात आले आहे की, जानेवारी २०२२ मध्ये वेदांता कंपनीने गुंतवणुकीबाबत एमआयडीसीला अर्ज दिला होता. मात्र, हायपॉवर कमिटीची बैठक सहा महिन्यानंतर झाली असल्याचे एमआयडीसीने म्हटले आहे. एमआयडीसीने दिलेल्या माहितीमुळे मविआ सरकारची दिरंगाईच वेदांता-फॉक्सकॉन राज्याबाहेर जाण्यासाठी कारणीभूत ठरली का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, जानेवारी ते जुलै दरम्यान राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी सुरू होत्या. त्याच्या परिणामी गुंतवणुकीकडे दुर्लक्ष झाले का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 

एकाच दिवसात माहिती दिल्याने चर्चा -

वेदांता प्रकल्पाबाबत माहिती मागवणारा माहिती अधिकारातंर्गत अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जाला एमआयडीसीने एकाच दिवसात उत्तर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ज्या दिवशी हा अर्ज दाखल झाला. त्याच दिवशी RTI ला उत्तर देण्यात आल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी एका दिवसात माहिती मिळाली म्हणून जे टीका करतायेत त्यांच मला हसायला येत असल्याचे म्हटले. माहिती खरी असेल तर तात्काळ द्यायला हरकत काय आहे, असा सवालही त्यांनी केला. 

IPL_Entry_Point

विभाग