मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  म्हाडाचे अध्यक्षपद काही मला गप्प बसण्यासाठी दिलेले नाही! शिरूर लोकसभा निवडणूक लढवण्यावर आढळराव पाटील ठाम

म्हाडाचे अध्यक्षपद काही मला गप्प बसण्यासाठी दिलेले नाही! शिरूर लोकसभा निवडणूक लढवण्यावर आढळराव पाटील ठाम

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 17, 2024 12:42 PM IST

Shivajirao Adhalrao Patil on shirur loksabha election : पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाच्या (पुणे) म्हाडा अध्यक्षपदी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, ते शिरूर लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.

Shivajirao Adhalrao Patil on shirur loksabha election
Shivajirao Adhalrao Patil on shirur loksabha election

Shivajirao Adhalrao Patil on shirur loksabha election : पुणे गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाच्या (पुणे) म्हाडा अध्यक्षपदी शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. गेल्या चार वर्षांपासून हे पद रिक्त होते. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची निवड झाल्याने ते लोकसभा लढवणार नाही अशी चर्चा सुरू असतांना ते शिरूर लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोल्हापूर येथे पत्रकारांची संवाद साधतांना आढळराव पाटील बोलत होते.

शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी शुक्रवारी निवड करण्यात आली आहे. त्यांची म्हाडाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने ही जागा अजित पावर गट किंवा भाजपला मिळणार असल्याची चर्चा सुरू होती. आढळराव पाटील हे शिरूर लोकसभेच्या रिंगणातुन बाहेर काढण्यात आले अशी चर्चा मतदार संघात सुरू आहे. मात्र, या चर्चांवर शिवाजी आढळराव पाटील यांनी मौन सोडले असून त्यांनी शिरूर लोकसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार केला आहे. आढळराव पाटील म्हणाले, अध्यक्षपदासाठी लोकसभा निवडणूक न लढवणाऱ्यापैकी मी नाही, मी लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार असा दावा देखील पाटील यांनी केला आहे.

कोल्हापूर येथे एका वृत्त वाहिणीशी बोलतांना पाटील म्हणाले, म्हाडाचं अध्यक्षपद ही मोठी बाब आहे, असे मला वाटत नाही. मी करवीर नगरीत आलो आणि म्हाडाचे अध्यक्ष पद मला मिळाले हा योगायोग आहे. सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घराची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ही जबाबदारी मी पार पडणार आहे.

लोकसभेच्या उमेदवारीचा आणि म्हाडाच्या अध्यक्षपदाचा काहीही संबंध नाही. मी लोकसभेच्या निवडणुकीला उभा राहणार हे ठरलं आहे. त्यात कोणातही बदल करणार नाही. कारण मला माझ्या मतदार संघ सांभाळायचा आहे. तसे मुख्यमंत्री देखील मला म्हणाले आहे. त्यामुळे मी ही निवडणूक लढवणार आहे आणि जिंकून देखील येणार आहे, अशा विश्वास देखील शिवाजीरायव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

IPL_Entry_Point

विभाग