विक्रोळीत MHADAच्या इमारतीचा स्लॅब कोसळला; ढिगारा अंगावर पडल्याने २ वृद्ध नागरिकांचा मृत्यू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  विक्रोळीत MHADAच्या इमारतीचा स्लॅब कोसळला; ढिगारा अंगावर पडल्याने २ वृद्ध नागरिकांचा मृत्यू

विक्रोळीत MHADAच्या इमारतीचा स्लॅब कोसळला; ढिगारा अंगावर पडल्याने २ वृद्ध नागरिकांचा मृत्यू

May 30, 2024 11:02 PM IST

MHADA Building : विक्रोळीत म्हाडाच्या एका इमारतीचा स्लॅब कोसळून दोन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही इमारत विक्रोळी पूर्व येथील रमाबाई आंबेडकर उद्यानाजवळ होती.

विक्रोळीत MHADAच्या इमारतीचा स्लॅब कोसळला
विक्रोळीत MHADAच्या इमारतीचा स्लॅब कोसळला

Mhada building slab collapses in vikrol :पावसाळ्यापूर्वी म्हाडाकडून दक्षिण मुंबईतील २० अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असताना आता विक्रोळीत म्हाडाच्या एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत इमारतीत रहात असलेल्या २ रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. स्लॅबचा ढिगारा अंगावर कोसळल्याने दोन जण जखमी झाले होते. त्यांच्यावर विक्रोळीतील आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

शरद मशालकर (७५) आणि सुरेश म्हाडाळकर (७८) अशी मृत झालेल्या रहिवाशांची नावे आहेत. ही घटना विक्रोळी पूर्व येथील रमाबाई आंबेडकर उद्यानाजवळच्या म्हाडा इमारतीत घडली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी पूर्व येथील म्हाडाच्या ४० क्रमांक इमारतीमध्ये ही घटना घडली. इमारतीतील एका घराचा स्लॅब कोसळला यात दोन जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनाग्रस्त इमारत तीन मजल्याची आहे. म्हाडाच्या या इमारतीमधील एका घराच्या छताच्या स्लॅब कोसळला. कोसळलेल्या स्लॅबचा ढिगारा अंगावर पडल्यामुळे दोन जण मुळे दोन जण जखमी झाले होते. त्यांना स्थानिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 

गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास अचानक या इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरील छताचा काही भाग पहिल्या मजल्यावर कोसळला. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील छत तळ मजल्यावर कोसळले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगारा बाजूला करत शरद मशालकर आणि सुरेश म्हाडाळकर या दोघांना बाहेर काढले. 

दक्षिण मुंबईतील २० अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर -

म्हाडाने दक्षिण मुंबईतील अतिधोकादायक आणि तत्काळ रिकाम्या करण्याची गरज असलेल्या २० निवासी इमारतींची यादी जाहीर केली आहे. 

मुंबई महापालिकेने एकूण १८८ मोडकळीस आलेल्या इमारती जाहीर केल्या असून तेथील रहिवाशांना तातडीने रिकाम्या करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

मोडकळीस आलेल्या इमारती शहरात एकूण १० हजारांहून अधिक मोडकळीस आलेल्या इमारती आहेत. मात्र, यात दुरुस्ती योग्य इमारतींच्या संख्येचाही समावेश आहे.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी राज्य गृहनिर्माण प्राधिकरणाकडून मान्सूनपूर्व ऑडिट केले जाते आणि त्या निकालाच्या आधारे या 'धोकादायक' इमारतींमधील रहिवाशांना रिकाम्या करण्याच्या नोटिसा बजावल्या जातात.

कोठे आहेत या धोकादायक इमारती -

म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक धोकादायक २० इमारतींची यादी गिरगाव, काळबादेवी, खेतवाडी, कामाठीपुरा या भागातील असून ८० वर्षांहून अधिक जुन्या आहेत. या २० अतिजोखमीच्या इमारतींमध्ये ४९४ रहिवासी आणि २१७ अनिवासी भाडेकरू आहेत.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर