मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai MHADA Lottery 2024 : मुंबईत घर घेण्याची सुवर्णसंधी, दिवाळीत म्हाडाची ७०० घरांची सोडत

Mumbai MHADA Lottery 2024 : मुंबईत घर घेण्याची सुवर्णसंधी, दिवाळीत म्हाडाची ७०० घरांची सोडत

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 05, 2024 12:17 PM IST

Upcoming Mumbai MHADA Lottery: म्हाडाच्या घरांच्या सोडतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Mhada Houses Lottery
Mhada Houses Lottery

Mumbai MHADA Lottery 2024: मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर यंदा म्हाडाच्या घरांची लॉटरी निघणार आहे. या माध्यमातून ७०० घरांची सोडत निघणार आहे. प्रथमच म्हाडा मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी उच्च दर्जाच्या सोयीसुविधा असलेले घरे तयार करत आहेत. परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणारे म्हाडा या अलिशान घरांसाठी किती किंमत आकारणार? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

म्हाडातर्फे येत्या दिवाळीत ७०० घरांसाठी सोडत काढली जाणार आहे. यात म्हाडाचा पहिला हायफाय प्रोजेक्ट असलेल्या ३३२ घरांचा समावेश आहे. गोरेगाव रेल्वे स्थानकापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या या प्रोजेक्टमध्ये जिम, स्वीमिंग पूल, क्लब हाऊस अशा उच्च दर्जाच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती या घरांसाठी अर्ज करु शकणार आहेत.

गोरेगावच्या प्रेमनगर येथील ३९ मजली टॉवर उभारण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. सध्या ३९ मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे. मार्च २०१५ पर्यंत हे प्रोजेक्ट पूर्ण करण्याचे म्हाडाचे टार्गेट होते. मात्र, कामाचा वेग पाहता हा प्रोजेक्ट येत्या दिवाळीपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सर्वसामन्यांना मुंबईत घर खरेदी करता यावे, यासाठी म्हाडाचे प्रयत्न सुरू आहेत. दरवर्षी किमान चार ते पाच हजार घरांसाठी लॉटरी काढण्याचा आमचा प्रयत्न राहील, असा मानस म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जैस्वाल यांनी व्यक्त केला.

WhatsApp channel

विभाग