महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोकण मंडळातर्फे २,१४७ सदनिका आणि ११० भूखंड विक्रीकरिता ५ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता लॉटरी काढण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत ठाणे येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ही लॉटरी काढली जाणार आहे. या लॉटरीसाठी सुमारे २४,९११ अर्ज अनामत रक्कमेसह आले आहेत.
लॉटरी सोडतीसाठी अनिवार्य परताव्या योग्य अर्नेस्ट मनी डिपॉझिटसह म्हाडाला २४ हजार ९११ अर्ज प्राप्त झाले आहेत. पाच फेब्रुवारी रोजजी दुपारी एक वाजता सोडतीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्याधिकारी रेवती गायकर यांनी दिली.
ठाणे शहर, ठाणे जिल्हा, रायगड आणि सिंधुदुर्ग येथे कोकण मंडळाने विकसित केलेल्या विविध गृहनिर्माण योजनांमध्ये हे फ्लॅट आणि भूखंड आहेत. गेल्या वर्षी ११ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली होती आणि ६ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली होती.
लॉटरीच्या दिवशी अर्जदारांना एसएमएस, ईमेल आणि म्हाडा लॉटरी अॅपद्वारे तात्काळ निकाल मिळणार आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळानं २२६४ घरांच्या विक्रीसाठी ऑनलाईन सोडतीसाठी अर्ज मागवले होते. या सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत ५९४ सदनिका, १५ टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत ८२५ सदनिका, कोकण मंडळाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत विखुरलेल्या ७२८ सदनिका, रोहा-रायगड आणि सिंधुदुर्ग येथे ११७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले होते.
यापूर्वी ही सोडत ३१ जानेवारी २०२५ रोजी काढली जाणार होती, मात्र आता ती ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. कोकण मंडळाच्या या घरांच्या संगणकीय सोडतीचा निकाल अर्जदारांना निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे , ई-मेल द्वारे तसेच ऍपवर उपलब्ध करुन दिला जातो.
संबंधित बातम्या