MHADA Lottery 2024 Mumbai: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या लॉटरीत यंदा २०३० घरांसाठी लॉटरी जारी केली. त्यात तारदेव, गोरेगाव, मालाड, बोरिवली, मुलुंड, जुहू या भागात उच्च उत्पन्न गटातील एक कोटी रुपयांपासून ते सात कोटी ५८ लाख रुपयांपर्यंतचे फ्लॅट उपलब्ध आहेत. दक्षिण मुंबईतील ताडदेव परिसरातील १५०० चौरस फुटांचे ७ कोटी ५७ लाख रुपयांचे प्लॅट सर्वात महाग आहेत. परंतु, २५ हजार पगार असलेले उमेदवार म्हाडाच्या लॉटरीसाठी पात्र आहेत का? म्हाडाच्या लॉटरीसाठी कुठे अर्ज करायचा यांसारखी महत्त्त्वाची प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात.
म्हाडाने ९ ऑगस्टपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली असून ४ सप्टेंबर रोजी रात्री ११.४५ वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे.म्हाडा लॉटरी २०२४ चा निकाल १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होईल. म्हाडा च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हाडा लॉटरी २०२४ साठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. म्हाडाने एक मोबाइल अॅप्लिकेशन देखील विकसित केले आहे, जिथे अर्जदारांना स्वत: ची नोंदणी करणे आवश्यक आहे. मोबाइल अॅपवर व्यक्तीची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तो म्हाडा लॉटरी २०२४ साठी अर्ज करू शकतो.
म्हाडाच्या नियमानुसार वार्षिक ६ लाख रुपयांपर्यंत कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्यांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातील घरासाठी अर्ज करता येतो. ६ लाख ते ९ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना एलआयजी श्रेणीत अर्ज करता येईल. ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न ९ लाख ते १२ लाख रुपयांपर्यंत आहे ते एमआयजी श्रेणीत आणि १२ लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्यांसाठी एचआयजी श्रेणीअंतर्गत अर्ज करू शकतात. म्हाडाच्या लॉटरीसाठी पती-पत्नीचे वार्षिक उत्पन्न कौटुंबिक उत्पन्न मानले जाते. व्यक्तीचे आई-वडील किंवा भावंडांचे उत्पन्न हे कौटुंबिक उत्पन्न मानले जात नाही.
गोरेगाव येथील म्हाडाच्या फ्लॅटची किंमत १ कोटी ३३ लाख रुपये असून महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटीने (महारेरा) डिसेंबर २०२४ पर्यंतची डेडलाईन दिली आहे. आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आणि निम्न उत्पन्न गट (एलआयजी) मध्येही काही अपार्टमेंट्स आहेत. मानखुर्द, विक्रोळी, बोरिवली, कांदिवली, मालाड आदी भागांत प्लॅटची किंमत २९ लाख ते एक कोटीपर्यंत आहे.
म्हाडा लॉटरी २०२३ अंतर्गत राज्य गृहनिर्माण प्राधिकरणाने मुंबई शहरातील ४ हजार ८२ परवडणाऱ्या घरांची विक्री केली होती. म्हाडाकडे चार हजारांहून अधिक घरांसाठी एक लाखांहून अधिक अर्ज आले होते.
संबंधित बातम्या