मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मुंबईत स्वत:च्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या १९०० घरांसाठी लॉटरीसाठी मुहूर्त ठरला!

मुंबईत स्वत:च्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! म्हाडाच्या १९०० घरांसाठी लॉटरीसाठी मुहूर्त ठरला!

Jun 29, 2024 09:28 PM IST

Mumbai Mhada Lottery2024: मुंबईकरांची ही इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबईतील१९००घरांसाठी जुलै महिन्यात जाहिरात प्रसिद्ध होणार असून ऑगस्टमध्ये सोडत काढण्याची तयारी म्हाडाने केली आहे.

म्हाडाच्या १९०० घरांसाठी लॉटरीसाठी मुहूर्त ठरला!
म्हाडाच्या १९०० घरांसाठी लॉटरीसाठी मुहूर्त ठरला!

Mumbai Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या घरांसाठी लॉटरीची वाट पाहणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.आता सर्वसामान्य नागरिक तसेच मुंबईत घर घेण्याची इच्छा असणाऱ्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. याचे कारण म्हाडा गृहनिर्माण मंडळाच्या सोडतीला (MHADA Lottery) अखेर मुहूर्त मिळाला आहे. मुंबईकरांची ही इच्छा आता लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबईतील १९०० घरांसाठी जुलै महिन्यात जाहिरात प्रसिद्ध होणार असून ऑगस्टमध्ये सोडत काढण्याची तयारी म्हाडाने केली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरातील ही घरं सर्व उत्पन्न गटासाठी असणार आहेत. या घरांसाठी जुलैमध्ये लॉटरीची जाहिरात निघणार आहे. तर, ऑगस्टमध्ये सोडत काढली जाईल, अशी माहिती समोर येत आहे. मात्र, या घरांचे लोकेशन काय असणार हे मात्र अद्याप समजलेले नाही.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईत घराच्या किंमती गगनाला भिडल्या असल्याने मुंबईत हक्काचं घर घेणं मध्यम वर्गीयांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. वनबीएचके घरांच्या किंमती कोरोडोच्या घरात गेल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहत असतात. म्हाडा मध्यम वर्गीयांना परवडतील अशा दरात घरे उपलब्ध करून देत असते. म्हाडा मुंबईसह राज्यातील अनेक शहरांत घरे उपलब्ध करुन देतात. स्वस्त दरात व मोक्याच्या जागी असलेली घरांसाठी लोकांच्या उड्या पडतात. म्हाडाच्या मुंबई मंडळाने ऑगस्ट २०२३ मध्ये मुंबईतील जवळपास चार हजार घरांची लॉटरी काढली होती. यासाठी तब्बल सव्वा लाख अर्ज प्राप्त झाले होते.

ऑगस्ट २०२३ मध्ये म्हाडाने गोरेगाव, विक्रोळी येथील घरांसाठी लॉटरी काढली होती. त्यानंतर या वर्षासाठी म्हाडाची लॉटरी कधी प्रसिद्ध होणार याची सर्वांनाच प्रतीक्षा होती. मात्र, आता अखेर ही प्रतीक्षा संपणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने जवळपास १९०० घरांसाठी लॉटरी काढण्याची तयारी सुरू केली आहे.

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५ हजार ३११ घरांची सोडत फेब्रवारीमध्ये सोडत काढण्यात आली होती.

 

आता म्हाडाकडून १९०० सदनिकांसाठी लॉटरी काढली जाणार आहे. या संदर्भात म्हाडाकडून लवकरच सोडतीची तारीख आणि ठिकाण जाहीर केले जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात जाहिरात निघणार असून ऑगस्ट महिन्यात यासाठी सोडत निघण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel