MHADA Lottery : ठाणे, कल्याण, पालघर येथे स्वस्तात घर हवे? म्हाडाची १२,६३६ घरांची सोडत जाहीर; असा करा अर्ज
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  MHADA Lottery : ठाणे, कल्याण, पालघर येथे स्वस्तात घर हवे? म्हाडाची १२,६३६ घरांची सोडत जाहीर; असा करा अर्ज

MHADA Lottery : ठाणे, कल्याण, पालघर येथे स्वस्तात घर हवे? म्हाडाची १२,६३६ घरांची सोडत जाहीर; असा करा अर्ज

Oct 11, 2024 10:44 PM IST

MHADA Lottery News : म्हाडाच्या कोकण मंडळाने १२,६३६ घरांची सोडत जाहीर केली आहे. या सोडतीत ठाणे, कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील घरांचा समावेश आहे.

MHADA Lottery News : ठाणे, कल्याण, पालघर येथे स्वस्तात घर हवे आहे? म्हाडाची १२,६३६ घरांची सोडत जाहीर; असा करा अर्ज
MHADA Lottery News : ठाणे, कल्याण, पालघर येथे स्वस्तात घर हवे आहे? म्हाडाची १२,६३६ घरांची सोडत जाहीर; असा करा अर्ज

ठाणे, कल्याण, पालघर येथे बजेटमध्ये घर घेण्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. कारण महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) कोकण मंडळाने १२,६३६ घरांची सोडत जाहीर केली आहे. या सोडतीत ठाणे, कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील घरांचा समावेश आहे.

यापैकी ११,१८७ घरे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यासाठी अर्ज आणि नोंदणी प्रक्रिया आज शुक्रवारी (११ ऑक्टोबर) दुपारी १२.३० वाजता गो लाईव्ह कार्यक्रमांतर्गत सुरू झाली आहे.

तुम्ही कधी अर्ज करू शकता?

ही सोडत दोन टप्प्यात काढण्यात येणार आहे. १४३९ घरांची लॉटरी संगणकीकृत प्रणाली आणि ॲपद्वारे काढण्यात येणार आहे. अर्जदार Android किंवा iOS प्रणाली वापरून अर्ज डाउनलोड करू शकतात. अर्ज नोंदणी प्रक्रिया म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in वर उपलब्ध आहे. अर्जदार १० डिसेंबर रोजी रात्री १०.५९ वाजेपर्यंत या सोडतीत सहभागी होऊ शकतात.

पैसे कधी जमा करावे लागतील?

अर्जदार ११ डिसेंबर रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अनामत रक्कम ऑनलाइन भरू शकतात. अर्जदार १ डिसेंबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत ITGS/NEFT द्वारे जमा केलेली रक्कम भरू शकतात. सर्व कागदपत्रे पूर्ण करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरतील.

ड्राफ्ट यादी कुठे पाहू शकता?

सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध केली जाईल. यानंतर, अर्जदार २० डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मसुदा यादीवर त्यांचे दावे आणि हरकती नोंदवू शकतात. अर्जदारांसाठी संकेतस्थळावर मार्गदर्शक पुस्तिका, ऑडिओ टेप, हेल्प साइट्स उपलब्ध आहेत.

या वेबसाइटवर नोंदणी करता येईल

कोकण विभागाच्या मुख्याधिकारी रेवती गायकर यांनी अर्जदारांनी ही माहिती पाहावी, असे आवाहन केले आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेअंतर्गत या सोडतीमध्ये ११,१८७ घरे उपलब्ध आहेत. https://lottery.mhada.gov.in या वेबसाइटवर घरांची नोंदणी करून अर्ज करावा लागेल. हेल्पलाइन क्रमांक ०२२-६९४६८१०० उपलब्ध आहे.

मोबाईलवर निकाल सोडतीत सहभागी होणाऱ्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या वेबसाइटवर २४ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. १०वी पात्र अर्जांची संगणकीय सोडती २७ डिसेंबर रोजी जाहीर केली जाईल. अर्जदारांना सोडतीचा निकाल मोबाईलवर एसएमएस, ई-मेल, ॲपद्वारे लगेच मिळेल. 'गो-लाइव्ह' कार्यक्रमांतर्गत म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर